शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

दुर्लक्षित खड्डे प्राण्यांच्या जिवावर, एकाच दिवशी अपघाताच्या दोन घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 23:39 IST

प्रशासनाचा हलगर्जीपणा : दापोडी, देहूरोडला एकाच दिवशी अपघाताच्या दोन घटना

पिंपरी : शहरात व कॅन्टोन्मेंट हद्दीत विविध कामांसाठी खोदाई करण्यात येते. मात्र, वेळीच खड्डे बुजविण्यात येत नाहीत. रस्त्याच्या बाजूला असलेले खड्डे व चर ही मुक्या प्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. देहूरोड व दापोडी भागात एका दिवशी सोमवारी म्हैस व गाय खड्ड्यात पडण्याच्यादोन घटना घडल्या. अग्निशामकचे जवान व नागरिकांच्या मदतीने त्यांची सुखरुप सुटका झाली. मात्र, उघड्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका असून, प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, अशी मागणी होत आहे.

नाल्याचे काम सुरू असलेल्या खड्ड्यात पडलेली म्हैस दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. ही घटना दापोडी येथील मोरया हॉस्पिटलसमोर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. मोरया हॉस्पिटलजवळील रस्त्यालगत महापालिकेकडून नाल्याचे काम सुरू आहे. यासाठी सात फूट खोल खड्डा खोदण्यात आला असून, त्यावर कसलेही झाकण टाकलेले नव्हते. दरम्यान, या खड्ड्यात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बसंती नावाची म्हैस पडली. खड्ड्याची रुंदीही कमी असल्याने म्हैस त्यामध्ये जाम अडकून बसली. तसेच जोरजोरात ओरडू लागली. परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत म्हशीला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच अग्निशामक दलालाही कळविले. यानंतर काही वेळातच संत तुकारामनगर व रहाटणी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. म्हशीला बाहेर काढण्यासाठी बुलडोझरची मदत घेण्यात आली. म्हशीच्या दोन्ही पायांमध्ये दोरी अडकवून बुलडोझरच्या साहाय्याने आल्हादपणे म्हशीला उचलून बाहेर काढण्यात आले. या कामासाठी नागरिकांनीही मदत केली. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर बसंती नावाची म्हैस सुखरूप खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश आले. अशोक कानडे, विलास पाटील, मनोज मोरे, बबुशा गवारी, विशाल पोटे, अमोल रांजणे, राजाराम चौरे या अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले.चरीत अडकलेली गाय सुखरुप१देहूगाव : येथील देहूरोड रस्त्यावर झेंडे मळ्याजवळ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत खड्ड्यात पडलेल्या गाईला तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर जेसीबीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.२खासगी कंपनीने आॅप्टिक फायबर केबलसाठी खोदाई केली आहे. पण ते रस्ते बुजविले नाहीत. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. माळीनगर येथील दत्तात्रय टिळेकर यांची गाय रस्त्याच्या कडेला चरण्यासाठी गेली होती. येथील गवत तीन ते चार फूट उंच असल्याने तो चर दिसत नव्हता. ही गाय चरताना या तीन फूट रुंद व आठ फूट खोल चरामध्ये पडली.३या चरातून बाहेर येण्यासाठी जिवाच्या आकांताने धडपड करू लागली. पण चिखलात ती अधिकच रुतून बसली. हे दृष्य पाहून मालक दत्तात्रय टिळेकर हतबल झाले.४दरम्यान, रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली. गाई बाहेर येण्यास काहीही संधी नसल्याचे लक्षात येताच काही तरुणांनी दोर आणले व तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हा सारा प्रकार सुमारे अर्धातास चालला होता. परंतु, हा प्रयत्नही फोल ठरल्यानंतर जेसीबी आणून चराच्या बाजूने मोठा खड्डा घेण्यास सुरुवात केली़ त्यातून रस्ता करून गाईला हळवारपणे बाहेर काढण्यात आले़ त्यानंतर उपस्थित नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड