शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 02:07 IST

अपघाताला एक वर्ष पूर्ण : बोगद्यात उतरण्यासाठी लिफ्टची सोय; सुरक्षेची घेतली जातेय काळजी

अकोले : नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताला एक वर्ष पूर्ण होत आहे. प्रकल्पाचे काम प्रगतिथावर आहे. अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या कामाच्या व्यवस्थेत बदल करून बोगदा खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामगारांना बोगद्यात उतरण्यासाठी लिप्टची सोय करण्यात आली आहे.

मागील वर्षी दि. २० नोव्हेंबरला अकोले येथील पाच नंबर शॉप्टच्या ठिकाणी काम करून वर येत असताना क्रेनचा वायररोप तुटून दोनशे फूट खाली आदळून आठ कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर तीन महिने काम बंद ठेवून जीविताला धोका असणाºया यंत्रणेत बदल करून काम जोमाने सुरू करण्यात आले आहे. बोगद्यात दोनशे फूट खोल खाली उतरण्यासाठी कामगारांना लिप्टची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कामाच्या ठिकाणी असणारी जुनी यंत्रसामग्री बदलून नवीन यंत्ररचना करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना दिली. नीरा नदी ते उजनी धरण असा हा नदीजोड प्रकल्प असून तावशी, भवानीनगर, काझड, अकोले, भादलवाडी, डाळजमार्गे उजनी धरण असा बोगद्यामार्गे नदीजोड प्रकल्प असून, मराठवाड्याला पाणी मिळावे यासाठी कृष्णा मराठवाडा पाटबंधारे विभाग उस्मानाबाद यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच शेतकºयांचा विरोध असून, आता कृष्णा नदीचे पाणी अगोदर नीरा नदीत आणा. त्यानंतर नीरा नदीचे ८ टीएमसी पाणी उजनी धरणात सोडा यासाठी आता शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, काझड, अकोले, भादलवाडी या गावांच्या हद्दीमध्ये जमिनीपासून १५० फूट खोल खाली रात्रंदिवस युद्धपातळीवर बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे.२कुंभी-कासारी-कडवी-वारणा-कृष्णा-नीरा ते भीमा असा हा सुमारे दोनशे किलोमीटरचा नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव तयार आहे. कोल्हापूर-सांगली-सातारा-पुणे-उस्मानाबाद ते सोलापूर या जिल्ह्यांतून हा पाण्याचा प्रवास होऊन त्याचा साठा उजनी धरणात करण्याचा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र ठराविक दिवसांनी यासाठी विरोध सुरू असून पूर्णत्वाला नेण्यासाठी अडचणींचा काळ ठरणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीwater transportजलवाहतूक