शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"सूर्य कायमचा संपला..." जे.पी. नड्डा यांना नीलम गोऱ्हे यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 14:26 IST

देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही

पुणे : देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे केला होता. यावर विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेचे उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या, की जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा रात किड्यांना अस वाटत की सूर्य हा कायमचा संपला आहे. पण सकाळ झाल्यावर त्यांच्या ते लक्षात येत. असा टोला यावेळी गोऱ्हे यांनी जे. पी. नड्डा यांना लगावला आहे. पुण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी त्या बोलत होते.

अशा लोकांना बोलायचं अधिकार नाही

खासदार संजय राऊत यांच्या अटकेबाबत नीलम गोऱ्हे यांना विचारल असता त्या म्हणाल्या,  कुठल्याही व्यक्ती बाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना म्हणजेच तपास सुरू असताना मत व्यक्त करणे योग्य नाही. पण एक गोष्ट आहे की खासदार संजय राऊत यांनी जी मुदत मागितली होती. ती मुदत देण्यात आली नाही. अनेक वर्ष याचा तपास सुरू आहे. संजय राऊत हे सामाजिक काम तसेच पत्रकारांच्या समस्येवर काम करत असून ते याही परिस्थितीवर योग्य प्रकारे ते आपली बाजू मांडतील. ज्यांनी मृत सहित्यकांची मुंडकी कापली आहे. आणि सांस्कृतिक अतिक्रमण केलं आहे. अशा प्रकारचे लोक जेव्हा बोलायला लागतात. तेव्हा त्यांना अशा पद्धतीने बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. एखाद्या झाडावर जसे बानगुडे असतात तसे या घटनेवर काही लोक बोलत आहे अशी टीका यावेळी गोऱ्हे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत बाबत अजूनही प्रतिक्रिया दिली नाही यावर गोऱ्हे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या,  याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयीन तपास सुरू असताना अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मला एक वाटत आहे की ईडी, सीबीआय अशा संस्थाचा जर कालमर्यादेत निकाल लागला तर लोकांनाही कळेल अस देखील यावेळी गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाNeelam gorheनीलम गो-हेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण