शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या प्रगतीत ‘ती’चा सन्मान आवश्यक- नयना गुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 02:02 IST

‘ती’चा गणपती हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याची भावना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी व्यक्त केली.

समाजात महिलांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ‘ती’ वेगवेगळ्या रूपांत येते. आई, पत्नी, मैत्रीण, बहीण, शिक्षिका अशा विविध रूपांमध्ये ती असते. त्यामुळे ‘ती’ समाजाच्या प्रगतीतील अविभाज्य भाग आहे. त्यासाठी तिला महत्त्व देणे आवश्यक असून त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:च्या घरापासून करायला हवी. सण, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ‘ती’ला मानाचे स्थान द्यायला हवे. त्या दृष्टीने ‘लोकमत’ने सुरू केलेला ‘ती’चा गणपती हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याची भावना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी व्यक्त केली.गणेशोत्सव तसेच अन्य सार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांना प्राधान्य देण्याचे प्रमाण कमी आहे. घरांमधील सर्व सण-उत्सवांमध्ये महिला अग्रभागी असतात; पण सार्वजनिक ठिकाणी त्यांना दुजाभाव मिळतो. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. कारण समाजातील महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिला अनेक क्षेत्रांत पुढे जात असल्या तरी त्यांना अनेक मर्यादा येतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. पण, निसर्गानेच महिलांच्या खांद्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. त्या पेलण्यासाठी महिला सक्षम आहेत. त्याचबरोबर इतर जबाबदाºया पेलण्यासाठीही त्या पुढे येत आहेत. त्यांना समाजाकडून प्रोत्साहनाची गरज आहे. ‘लोकमत’च्या ‘ती’चा गणपती हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. सर्व महिलांनी एकत्रित येऊन एक आदर्श घालून दिला आहे. इतरांनीही या उपक्रमाचे अनुकरण करून महिलांना मानाचे स्थान द्यायला हवे.शासनाकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जातात. राजकारण, शासकीय नोकºयांमध्येही महिलांना आरक्षण आहे. पण, हे प्रयत्न एवढ्यापुरतेच मर्यादित नकोत. महिलांसमोर अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी महिला त्यांच्या परीने प्रयत्न करीतच असतात; पण त्यांना समाजाच्या मदतीची, प्रोत्साहनाचीही गरज आहे. कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचे स्थान महत्त्वाचे आहे. हे स्थान त्यांचा सन्मान करून आणखी बळकट करायला हवे. ‘ती’च्यासाठी ‘त्या’चा मदतीचा हात पुढे यायला हवा. दोघांमध्ये मनमोकळा संवाद घडून आल्यास समाजाच्या प्रगतीला हातभार लागेल. महिलांना पुढे जाताना पाहायचे असेल, तर त्यात दोघांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. आपण महिलांचा जेवढा मान राखू, तेवढाच मान त्यांच्याकडूनही मिळेल.सध्या महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. विविध क्षेत्रांत त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. कौटुंबिक जबाबदारीबरोबरच ‘ती’ या जबाबदाºयाही सक्षमपणे पेलत आहे. पण तरीही नैसर्गिकपणे तिच्यावर आलेल्या काही जबाबदाºयांना अनेक मर्यादा येतात. त्याचा परिणाम तिच्या सार्वजनिक जीवनातील प्रगतीवर होत असतो. पण, अनेक महिला त्यावरही मात करून पुढे जात आहेत. काही महिलांनी केवळ कौटुंबिक जबाबदारीच स्वीकारली आहे. महिलांचा ओढाही कुटुंबाकडे अधिक असतो. समाज सुदृढ होण्यासाठी हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे घरामध्येही महिलांना मानसन्मान मिळायला हवा, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याचे भान प्रत्येकाला असायला हवे. नोकºयांमध्येही अनेकदा महिलांना कमी लेखले जाते. त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाºया दिल्या जात नाहीत. त्यांच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते; पण महिला अधिकाºयांनी स्वत:हून पुढाकार घेतला तर अशा महत्त्वाच्या जबाबदाºयाही त्यांना मिळतात. माझ्यासह अनेक महिला अधिकारी महत्त्वाची पदे सक्षमपणे सांभाळत आहेत. अनेक महिलाही स्वत:हून ही पदे नाकारतात. तसे न करता महिलांनी एक आव्हान म्हणून अशा संधी सोडू नयेत. प्रत्येक क्षेत्र महत्त्वाचे आहे.महिला अनेक आव्हाने स्वीकारत आहेत. त्यांना आता समाजाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कोणताही सण-उत्सव केवळ निमित्त असते. ‘लोकमत’ने या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना ही संधी दिली आहे. अशा पद्धतीने महिला सक्षमीकरणासाठी, त्यांना योग्य मान देण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. ‘ती’ला सन्मान दिला, तरच समाजाची प्रगती होईल. यासाठी ‘त्या’चे योगदान महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPuneपुणे