शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’अभावी स्वस्त धान्यापासून ‘निराधार’, कार्ड काढण्यास येत असलेल्या अडचणींचा नाही विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 05:55 IST

आधार कार्ड नाही त्या ग्राहकांना स्वस्त धान्य दुकानांमधून येत्या १ आॅक्टोबरपासून स्वस्त धान्य वितरित करण्यात येणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, असे गरीब लाभार्थी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

पुणे : आधार कार्ड नाही त्या ग्राहकांना स्वस्त धान्य दुकानांमधून येत्या १ आॅक्टोबरपासून स्वस्त धान्य वितरित करण्यात येणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, असे गरीब लाभार्थी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे प्रशासन योग्य आणि गरजूंनाच लाभ मिळावा, म्हणून केंद्र शासनाच्या आदेशाने हा निर्णय घेतल्याचे सांगत असले तरी दुसरीकडे मात्र आधार कार्ड काढण्यामध्ये अनंत अडचणी आहेत, याचा विसर प्रशासनाला पडल्याचे चित्र आहे.स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेणाºया शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना स्वस्त धान्य देण्यात येणार नाही. मात्र, शिल्लक राहिलेले हे धान्य गरजूंना विकण्यात येणार आहे. प्रत्यक्षात हा खºया गरजूंच्या तोंडचा घास पळविण्याचाच प्रकार असून शिल्लक धान्य नेमक्या ‘कोणत्या गरजूं’ना विकले जाणार आहे, याचाही शोध घ्यावा लागणार आहे. शिधापत्रिकाधारकांना आधार जोडणी करण्यासाठी अवघा एक आठवडा शिल्लक राहिलेला आहे. मात्र, ज्यांच्याकडे आधार कार्डच नाही त्यांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.केंद्र शासनाकडून अन्नधान्याच्या अनुदानापोटी १ लाख ४० हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च करण्यात येतात. हे अनुदान खºया गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी आधार कार्ड क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. यापूर्वी गॅस सिलिंडरसाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला होता. पुणे जिल्ह्यामध्ये केवळ ३९ टक्के आधार प्रमाणीकरण करण्यात आल्याची स्थिती आहे. स्वस्त धान्य दुकानांमध्य्ये सप्टेंबरमध्ये २६ हजार ९०८ आधार प्रमाणीकरण केलेल्यांना धान्य वितरित करण्यात आलेले आहे. १ लाख २२ हजार ३४७ व्यवहार झाले आहेत. आधारशिवाय शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्यास मनाई करण्यात आल्याने धान्य शिल्लक राहणार आहे. हे धान्य शासनाकडे परत पाठविल्यानंतर त्यावर अतिरिक्त धान्य असल्याचा शेरा मारण्यात येतो. पुढील वर्षीच्या धान्य वितरणावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे शिल्लक धान्य गरजूंना विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण करून घेतलेल्यांचे प्रमाण अवघे २४ टक्के आहे. स्वस्त धान्य दुकानांमधील धान्य काळ्याबाजारात विकले जात असल्याची अनेक उदाहरणे आतापर्यंत समोर आलेली आहेत. अनेक दुकानदारांवर कायदेशीर कारवाईही झालेली आहे. या भ्रष्टाचारात अडकलेल्या दोन टोळ्यांवर पुणे शहर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाईही केलेली आहे.काळ््याबाजारात धान्य जाण्याची भीती- गरजूंच्या नावाखाली हे धान्य काळ्याबाजारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर आधार जोडणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. परंतु सध्या आधार केंद्रांचा बोजवारा उडाला आहे.- शहरासह जिल्ह्यामध्ये आधार नोंदणीच्या कामांमध्ये प्रचंड अडथळे येत आहेत.- नागरिकांना आधार नोंदणी करण्याची ठिकाणे मिळत नाहीत. या परिस्थितीमध्ये शिधापत्रिकाधारक आधार नोंदणी करून १ आॅक्टोबरच्या आतमध्ये आधार जोडणी कसे करणार, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Puneपुणे