शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘नकोशी’ होतेय हवीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2015 01:30 IST

‘आई पाहिजे, बहीण पाहिजे, पत्नी पाहिजे, मग मुलगी का नको?’ हा प्रश्न जिल्ह्यातील ग्रामस्थांना पटू लागला असून, ‘नकोशी’ आता हवीहवीशी होऊ लागली आहे.

बापू बैैलकर,  पुणे‘आई पाहिजे, बहीण पाहिजे, पत्नी पाहिजे, मग मुलगी का नको?’ हा प्रश्न जिल्ह्यातील ग्रामस्थांना पटू लागला असून, ‘नकोशी’ आता हवीहवीशी होऊ लागली आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत स्त्रीजन्माचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, ते हजारांमागे ९०० पर्यंत गेले आहे. मागास व दुर्गम अशा वेल्हे तालुक्यात तर हे प्रमाण ११६० वर गेले आहे, हे विशेष.गेल्या काही वर्षांत स्त्रीभ्रूणहत्या हा विषय ऐरणीवर आला आहे. मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाचा पुणे जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. महाराष्ट्रात हजारामागे ८९४ असे प्रमाण असताना जिल्ह्यात आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ते सरासरी ९०० पर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात १ कोटी ३३ लाख २६ हजार ५१५ इतक्या बालकांचा जन्म झाला. त्यांत ७० लाख ३५ हजार ३९१ मुले, तर ६२ लाख ९१ हजार १२६ मुलींचा जन्म झाला. याचे लिंग गुणोत्तर प्रमाण हे ८९४ इतके आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांत पुणे जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांत १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत ४९ हजार १९९ बालकांचा जन्म झाला असून, त्यांत २५ हजार ८९७ मुले व २३ हजार ३०२ मुलींचा समावेश आहे. हे लिंग गणोत्तर प्रमाण ९०० इतके आहे. २०१२-१३मध्ये हे प्रमाण जिल्ह्यात ८९४ तर २०१३-१४मध्ये ८८७ इतके होते. ते आता ९००पर्यंत गेले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांमुळे हे शक्य झाले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले. एका मुलीची हत्या झाली तर जगातील मुलगी, बहीण, आई, वहिनी, काकू, मामी, आत्या, मैत्रीण, पुतणी, भाची, शिक्षिका, पत्नी व आजी अशी नाती नष्ट होतील, हे पटवून देण्यात आरोग्य विभाग यशस्वी होत असल्याचे दिसून येते. यासाठी आरोग्य विभाग गरोदर मातांची नोंदणी १२ आठवड्यांच्या आत एम.सी.टी.एस. सॉफ्टवेअरद्वारे करतो. मातेने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर नियमित पाठपुरावा केला जातो. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दरमहा २ गरोदर माता शिबिरांचे आयोजन केले जाते. नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी कार्यक्षेत्रातील मातांना संस्थेत प्रसूती झाल्यास मातृत्व अनुदान योजनेतून ४०० रुपये रोख दिले जातात. जननी सुरक्षा योजनेत दारिद्र्यरेषेखालील व अनूसूचित जाती-जमातींमधील मातेची घरी प्रसूती झाल्यास ५०० रुपये व मानांकित संस्थेत प्रसूती झाल्यास ७०० रुपये दिले जातात. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेत दारिद्र्यरेषेखालील जोडप्याला १ किंवा २ मुली आहेत, त्यांना १० हजार रुपये प्रोत्साहनात्मक बक्षीस दिले जाते. या नवीन वर्षात ‘स्त्रीजन्माचे स्वागत’ ही नवी योजना जिल्हा परिषद राबवत आहे. या सर्वांचा सकारामत्क परिणाम जिल्ह्यात दिसू लागला आहे. यात दुर्गम व मागास समजला जाणारा वेल्हा तालुका आघाडीवर आहे. तेथे वर्षभरात २५७ बालकांचा जन्म झाला असून त्यांत १३८ मुली व ११९ मुले, असे ११६० गुणोत्तराचे प्रमाण आहे. मावळमध्ये ९६१, जुन्नरमध्ये ९२५, हवेलीत ९२२, मुळशीत ९०५ तर दौंडमध्ये ९०३ इतके प्रमाण आहे. पुरंदर तालुक्यात मात्र हे प्रमाण ८३१ असून ते जिल्ह्यात सर्वांत कमी आहे. त्यानंतर बारामतीतही ८४३ इतकेच प्रमाण आहे.---------पुरंदर, बारामती, शिरूर या तालुक्यात लिंगगुणोत्तराचे प्रमाण अजूनही समाधानकारक नाही. हे वाढविण्यासाठी या पुढील काळात प्रयत्न करणार आहोत. जिल्हा नियोजन व जिल्हा परिषद निधीतून पुढील काळात काही नवीन योजना आणता येतील का, याचाही विचार केला जाईल- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी----------> ११६०वेल्हे तालुक्यातील लिंग गुणोत्तराचे हे प्रमाण प्रशंसनीय आहे.> ८३१ एवढ्या जिल्ह्यात सर्वांत कमी प्रमाण आहे.> २000 जिल्हा परिषदेने या वर्षीपासून ‘स्त्रीजन्माचे स्वागत’ असा उपक्रम हाती घेतला असून, १ जुलै २0१५ पासून प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झालेल्या मातेस स्त्री अपत्य झाले, तर त्या अपत्याच्या नावावर २ हजार रुपयांचे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.