शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवकाश मोहिमांसाठी कुशल मनुष्यबळाची गरज : डॉ. के. कस्तुरीरंगन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 20:12 IST

विद्यापीठांना मोठ्या प्रमाणात जोडून घ्यावे लागेल. या प्रकारच्या गुंतवणुकीत पुरेशी वाढ करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देभारताचा २०२५ पर्यंतचा काळ महत्त्वाच्या अवकाश मोहिमांचा असणार विद्यापीठांनी संशोधन संस्थांशी करार करून संशोधन संस्कृती निर्माण करण्याची गरज

पुणे : पायभूत सुविधा आण तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही भारत प्रगती करत आहे. मात्र, भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम मनुष्यबळाची सध्या नितांत गरज आहे. त्यासाठी देशातील विद्यापीठांमध्ये भरीव कार्य करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठांनी संशोधन संस्थांशी करार करून संशोधन संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्त्रो) माजी अध्यक्ष व वरिष्ठ सल्लागार डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी मंगळवारी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयोजित ‘अवकाश विज्ञान’ (स्पेस सायन्सेस) या विषयातील तीनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन, वैज्ञानिक सल्लागार डॉ. जॉर्ज जोसेफ, उपग्रह कार्यक्रमाचे संचालक डॉ. शिवकुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ‘आयुका’चे संचालक डॉ. सौमेक रॉयचौधरी, ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अस्ट्रोफिजिक्स’चे संचालक डॉ. यशवंत गुप्ता, स्थानिक समन्वयक डॉ. पी. प्रदीप कुमार आदी उपस्थित होते. डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले, अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे. पायाभूत सुविधा देशात उपलब्ध आहेत. सध्या विविध महत्त्वाची मिशन हाती घेण्यात आली आहेत आणि ती कमी वेळात पूर्ण करण्याचे आव्हान आहे. पूर्वी एखादे मिशन पाच-पाच वर्षांचे नियोजन असायचे, ते आता केवळ दोन-तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट घेतले जाते. त्यासाठी आता विद्यापीठांना मोठ्या प्रमाणात जोडून घ्यावे लागेल. या प्रकारच्या गुंतवणुकीत पुरेशी वाढ करण्याची गरज आहे.डॉ. सिवन यांनीही कुशल मनुष्यबळाची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, भारताचा २०२५ पर्यंतचा काळ महत्त्वाच्या अवकाश मोहिमांचा असणार आहे. चांद्रयान मोहिमेबरोबरच सूर्यवलयाचा अभ्यास करणारे ‘आदित्य मिशन’, मंगळयान-२, २०२३ साली शुक्र ग्रहाबाबत ‘व्हीनस मिशन’, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणाचा संशोधन करणारे ‘गगनयान’, एटमॉस्फेरित सायन्सेसच्या (वातावरणीय शास्त्र) अनुषंगाने ‘दिशा १’ व ‘दिशा २’ अशा विविध मोहिमा नियोजित आहेत. त्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आतापासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज आहे. ---------

टॅग्स :Puneपुणेscienceविज्ञानuniversityविद्यापीठ