शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सत्य बोलण्याचे धाडस दाखविण्याची गरज :   डॉ. गणेशदेवी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 21:55 IST

आज देशातील प्रत्येक राज्य हे नागरिकांकडे जबाबदारी म्हणून नव्हे तर उत्तरदायित्व म्हणून बघत आहे. समाजात जे कुणी सत्य मांडू पाहात आहेत, त्यांना लक्ष्य करून त्यांचा आवाज दडपला जात आहे.

ठळक मुद्देपेन इंटरनॅशनल कॉँग्रेसला सुरूवातमहिलांचा अधिकार हा धर्म, संस्कृतीपेक्षाही अधिक महत्वपूर्णलुप्त होणा-या भाषांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न

पुणे : सध्याच्या आर्थिक जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भाषा, आवाज आणि विचारासमोर एकप्रकारचा धोका निर्माण झाला आहे, त्या धोक्याचा आपल्याला एकत्रितपणे सामना करायचा आहे. विचार हा भारतीय नागरिकरणाचा मुलाधार आहे. महात्मा गांधीजी यांनी दाखविलेल्या मागार्नुसार सत्य बोलण्याचे धाडस दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. विविधता लोकशाहीचा प्राण असल्याने विविधता आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, अशा शब्दातं पेन इंटरनँशनल कॉंग्रेसचे भारतीय निमंत्रक आणि ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेशदेवी यांनी देशभरातील लेखकांना आवाहन केले.     जगभरातील 80 देशातील 400 लेखक आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत पुण्यात पहिल्या पेन साऊथ इंडिया इंटरनँशनल कॉंग्रेसला मंगळवारपासून सुरूवात झाली. माझे सत्याचे प्रयोग ही यंदाच्या पेन इंटरनँशनल कॉंग्रेसची संकल्पना आहे. या उदघाटन सोहळ्यामध्ये डॉ. गणेश देवी यांचे  व्हाय पेन? व्हाय पुणे? याविषयावर व्याख्यान झाले त्यावेळी ते बोलत होते.     आगाखान पँलेस येथील कस्तुरबा गांधी यांच्या समाधीला पुष्प अर्पण करून अभिवादन करीत शांततामय प्रार्थना करण्यात आली.  पेन इंटनँशनल कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष जेनिफर सेलमेंट आणि संचालक कालर््स टोनर, सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां.ब मुजुमदार,सचिन ईटकर आणि सुनील महाजन उपस्थित होते.     पुण्यात जी मराठी भाषा बोलली जात आहे, त्याला 1500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. भारतीय भाषिक इतिहासाचा आढावा घेतला तर  इतर भाषांबरोबरच मराठीने देखील सक्षमपणे प्रतिनिधित्व केले आहे. आज पेन कॉंग्रेसमध्ये जे 80 देश सहभागी झाले आहेत त्यामाध्यमातून 4000 भाषा प्रतिनिधित्व करीत आहेत. या भाषांचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी आपण एकत्रितपणे उभे राहाण्याची आवश्यकता आहे, असे सांगून डॉ. गणेश देवी म्हणाले, आज  देशातील प्रत्येक राज्य हे नागरिकांकडे जबाबदारी म्हणून नव्हे तर उत्तरदायित्व म्हणून बघत आहे. समाजात जे कुणी सत्य मांडू पाहात आहेत, त्यांना लक्ष्य करून त्यांचा आवाज दडपला जात आहे. आज जगभरामध्ये विचारवंत आणि पत्रकारांवर हल्ले केले जात आहेत. त्या हल्ल्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. एक नव्या प्रकारचा हिंसक समाज निर्माण होत आहे. त्याच्यामागे अपरिमित लोभ असलेली अर्थव्यवस्था कारणीभूत आहे. मात्र यातून बाहेर निघायचे असेल तर त्याचे प्रत्युत्तर द्वेषाने किंवा घृणेने देता येणार नाही तर ते प्रेमानेच द्यावे लागेल. या पेन इंटरनँशनल कॉंग्रेसच्या माध्यमातून प्राचीन भारतीय स्वातंत्र्य पुन्हा आणण्याची संधी मिळाली आहे. जे सांगत आहे की संपूर्ण जग हे माझं असले तरी ते माज्या मालकीचे नाही तर मी त्याची मालकी आहे.     डॉ. शां.ब मुजुमदार आणि कार्ल्स टोमनर यांनीही आपले विचार व्यक्त केले................भारतात  पेन इंटरनँशनल कॉंग्रेस होण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याबरोबरच लुप्त होणा-या भाषांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे हा या पेन इंटरनँशनल कॉंग्रेस आयोजनाचा  हेतू आहे. पहिली महिला अध्यक्ष झाल्याचा आनंद नक्कीच वाटत आहे. विविध परिषदा, संवाद, व्याख्यानाच्या माध्यमातून हेच सातत्याने मांडत आलो आहोत की महिलांचा अधिकार हा धर्म, संस्कृतीपेक्षाही अधिक महत्वपूर्ण आहे.सध्याच्या काळात सत्य मांडणे हे खूप आवश्यक आणि आव्हानात्मक बनले आहे. पेन इंटरनँशनल कॉंग्रेसच्या माध्यमातून एकत्रितपणे विविधतेचा आवाज मांडला जात आहे- जेनिफर सेलमेंट, अध्यक्ष पेन इंटरनँशनल कॉंग्रे

टॅग्स :Puneपुणे