शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीच्या शास्त्रोक्त अभ्यासाची गरज : डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी; ४ दिवस आधी अंदाज शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 13:23 IST

गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यात एकावेळी मोठ्या भूभागावर गारपिटीचे संकट येऊ लागले आहे़ त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़ त्याचा शास्त्रोक्त अभ्यास होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी केले.

ठळक मुद्देसिमला आॅफिस वेधशाळेत डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांचे व्याख्यानफेब्रुवारीत वातावरण थंड असल्याने त्या थेट वेगाने जमिनीवर कोसळून करतात मोठे नुकसान

पुणे : गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यात एकावेळी मोठ्या भूभागावर गारपिटीचे संकट येऊ लागले आहे़ त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़ त्याचा शास्त्रोक्त अभ्यास होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी केले़ राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपीटीबाबत डॉ़ कुलकर्णी यांचे व्याख्यान सिमला आॅफिस वेधशाळेत आयोजित करण्यात आले होते़ डॉ़ कुलकर्णी म्हणाले, की २०१४ पासून प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या भूभागावर गारपीट होत आहे़ ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान राज्यात ३ ते ४ हजार हेक्टर आणि २०० तालुक्यांमध्ये ही गारपीट झाली़ अजूनही गारपीट मोजण्याचे कोणतेही साधन आपल्याकडे नाही़ ही गारपीट सकाळच्या वेळी झाली़ वातावरण थंड असल्याने या गारा अनेक तास तशाच होत्या़ उन्हाळ्यातही आपल्याकडे वळवाच्या पावसाबरोबर गारांचा पाऊस होतो़ पण, तो सायंकाळच्या वेळी होऊन या गारा उष्म्यामुळे लगेच वितळतात़ उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालचा उपसागर, अरबी समुद्रावरून येणारे वारे एकमेकांशी भिडल्याने त्यातील बाष्प मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन त्यांचे हिमकणात रूपांतर होते़ खालून हवेचा दाब असल्याने त्यांचे एकमेकांवर थर तयार होतात़ त्या जड झाल्यावर एखादा भागातून त्या खाली कोसळतात़फेब्रुवारीत वातावरण थंड असल्याने त्या हवेत न वितळता थेट वेगाने जमिनीवर कोसळून मोठे नुकसान करतात़ गारा यांचे एकूण ११ प्रकार असतात़ पण, त्याबाबत अजूनही लोकांपर्यंत आवश्यक ती जनजागृती झालेली नाही़ या गारा कधी, कोठे, किती वेळ आणि त्यांची जाडी किती होती याची माहिती लोकांनी नोंदवून ठेवून हवामान विभागाला कळविली तर डाटा तयार होऊ शकतो़ त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :HailstormगारपीटPuneपुणे