शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रँड निर्माण कारण्यासाठी जिद्द, चिकाटी हवी : उद्योजकांचे मत; ‘ब्रँडनामा’चे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 18:17 IST

रसिक आंतरभारती आणि प्रतिसाद कम्युनिकेशन्स यांच्या वतीने अभिजित जोग लिखित ‘ब्रँडनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेता सचिन खेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे आणि ई-आवृत्तीचे प्रकाशन झाले.

ठळक मुद्देप्रभाव पाडण्यात कमी पडलो : सचिन खेडेकरसचिन खेडेकर यांच्या हस्ते पुस्तकाचे आणि ई -आवृत्तीचे प्रकाशन

पुणे : मराठी माणूस उद्योगविश्वात मोठा झाला आहे. परंतु, स्वत: चा ब्रँड निर्माण करू न शकल्याने आपला प्रभाव पाडू शकलेला नाही, उद्योग, व्यवसाय कुणीही निर्माण करू शकतो. मात्र, ब्रँड निर्माण कारण्यासाठी जिद्द, चिकाटी याबरोबरच हुशारी आवश्यक असते, अशी भावना उद्योजकांनी व्यक्त केली.रसिक आंतरभारती आणि प्रतिसाद कम्युनिकेशन्स यांच्या वतीने अभिजित जोग लिखित ‘ब्रँडनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेता सचिन खेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे आणि ई -आवृत्तीचे प्रकाशन झाले. याप्रसंगी गौतम ठाकूर, शशांक परांजपे, श्रीकृष्ण चितळे आणि सौरभ गाडगीळ या चार उद्योजकांशी संवाद साधण्यात आला. या उद्योजकांच्या यशाचे गमक चित्रपट लेखक क्षितीज पटवर्धन यांनी मुलाखतीतून उलगडले. सचिन खेडेकर म्हणाले, ‘जाहिरातबाजीला महत्त्व न दिल्याने आपण मागे पडलो, असे नाही. मात्र प्रभाव पाडण्यात कमी पडलो असे म्हणण्यास वाव आहे.’लेखक अभिजीत जोग यांनी ब्रँडनामा या पुस्तकामागील आपली भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिश जोग आणि योगेश नांदुरकर यांनी केले, तर शैलेश नांदुरकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Sachin Khedekarसचिन खेडेकरPuneपुणे