........
एकलव्य न्यास संस्थेस अन्नधान्य व फळे वाटप
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वंदे मातरम संघटना, वंदे मातरम विद्यार्थी संघटना, संयुक्त युवा फिनिक्स सोसायटी व शिवरत्न प्रतिष्ठान यांच्या वतीने एकलव्य न्यास या संस्थेस अन्नधान्य आणि फळे वाटप करून शिवजयंती साजरी केली. यावेळी एकलव्य न्यासच्या संचालिका इंद्रायणी गावस्कर, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, सुनील देसाई, महेश बाटले, पीयूष देशमुख आदी उपस्थित होते.
...............
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पुणे कॅन्टोमेंट बँकेचे संचालक पोपट गायकवाड यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी मायकल साठे, विक्रम पवळे, सुमित गावडे आदी उपस्थित होते.
..............
शिवजयंतीनिमित्त शिवस्नेह मेळावा
पुणे: साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने शिवस्नेह आणि दुग्धपानाचे आयोजन केले होते. मंडळाच्या शिवमंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा जलाभिषेक करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी, शिवसेनेचे रामभाऊ पारिख, नगरसेवक अजय खेडेकर, विशाल धनवडे, माजी नगरसेवक मनीष साळुंखे आदी उपस्थित होते.
.........
शिवरायांच्या जीवनचरित्रातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र अभ्यासून त्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील ध्येयपूर्तीसाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन व्याख्याते विनोद बाबर केले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स यांच्या वतीने शिवजयंतीचा ऑनलाइन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते.