शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

साखर निर्यातीस प्रोत्साहन देण्याची गरज : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:30 IST

देशात आगामी गळीत हंगामात साखरेचे ३४५ लाख टन एवढे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. सध्या देशात अंदाजे ९० लाख मे. टन साखर शिल्लक आहे.

बावडा : देशात आगामी गळीत हंगामात साखरेचे ३४५ लाख टन एवढे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. सध्या देशात अंदाजे ९० लाख मे. टन साखर शिल्लक आहे. त्यामुळे शासनाकडे शेजारील चीन, बांगलादेश, इंडोनेशिया या देशांत शुभ्र साखर निर्यात करण्यासाठी अनुदानाच्या माध्यमातून प्रोत्साहन द्यावे तसेच रॉ शुगरचे धोरण लवकर ठरवावे, अशी मागणी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा भाग्यरत्न सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात झाली. या वेळी सर्व विषय एकमताने संमत करण्यात आले. पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रातही आगामी काळात ११० मे. टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशातील शिल्लक साखरेचा विचार करता नीरा-भीमा कारखाना ठराविक प्रमाणात रॉ शुगरचे उत्पादन घेणार आहे. त्यासाठी शासनाने लवकरच निर्यातीचे धोरण ठरविण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या १० सप्टेंबरला नवी दिल्लीत बैठक होणार आहे.मागील हंगामात कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिटन २४०० रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे. साखरेचे दर घसरल्याने २२०० रुपयांचा हप्ता दिलेला आहे. कारखान्याकडे फक्त ६ कोटी रुपये भागभांडवल आहे. कारखान्याचा कारभार काटकसरीने व पारदर्शी केल्याने कारखान्याची मालमत्ता ३२९ कोटी रुपयांची झाली आहे. याप्रसंगी वार्षिक सभेचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे भाषण झाले. प्रास्ताविक व अहवाल वाचन कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी केले. या वेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव, उदयसिंह पाटील, विलास वाघमोडे, मयूरसिंह पाटील, अनिल पाटील, विकास पाटील, किरण पाटील, देवराज जाधव, धनंजय कोरटकर, मनोज पाटील, मंगेश पाटील, संग्रामसिंह पाटील, प्रसाद पाटील, दत्तात्रय शिर्के, रणजित रणवरे, सुरेश मेहेर, महादेव घाडगे, श्रीमंत ढोले, धनंजय पाटील, सतीश अनपट, अशोक वनवे, मोहन गुळवे, नागेश नष्टे उपस्थित होते. सूत्रसंचालन अमर निलाखे तर आभार उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी मानले.केंद्र सरकारने द्यावा इथेनॉलला ५२ रुपयांचा दरकेंद्र सरकारने इथेनॉलला प्रतिलिटर ५२ रुपये एवढा दर देणे गरजेचे आहे. साखरेचा कमीतकमी विक्रीदर हा २९०० रुपयांवरून ३१०० रुपये करण्यात यावा, अशी मागणी या वेळी पाटील यांनी केली.आगामी गळीत हंगामामध्ये कारखाना सुमारे ७ लाख मे. टन उसाचे गाळप करणार आहे. या हंगामात साखर उतारा १२ टक्केचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्याकरिता संगणीकृत ऊसतोडणीकार्यक्रम शिस्तबद्ध राबविणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे