शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल युगात एकलव्य शिक्षण पध्दती हवी: राम ताकवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 19:13 IST

डिजिटल युगात सर्जनशीलता आणि कल्पकतेच्या बळावर विद्यार्थ्यांना टिकून राहता येईल.

ठळक मुद्देतंत्रज्ञानाचा वापर ज्या माणसाकडून केला जातो त्याची बुध्दीमत्ता अधिक महत्त्वाची

पुणे: डिजिटल युगात एकलव्याची शिक्षण पध्दती आणावी लागणार आहे. तसेच स्वत:चे, समाजाचे आणि विद्यापीठाचे भवितव्य घडवणारे विद्यार्थी तयार करावे लागणार आहेत. डिजिटल युगात सर्जनशीलता आणि कल्पकतेच्या बळावर विद्यार्थ्यांना टिकून राहता येईल,असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.राम ताकवले यांनी व्यक्त केले.भारती विद्यापीठाच्या ५४व्या वर्धापनदिन समारंभात ताकवले बोलत होते.या प्रसंगी भारती विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,कार्याध्यक्ष आनंदराव पाटील,कार्यवाह डॉ.विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, सरकार्यवाह डॉ. व.भा.म्हेत्रे, डॉ.एस.एम.सगरे आदी उपस्थित होते. डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनामुळे विद्यापीठाचा वर्धापनदिन शोकाकुल वातावरणात आणि साधेपणाने संपन्न झाला. यावेळी प्रा.मिलिंद जोशी यांनी संपादित केलेल्या विचारभारतीच्या डॉ.पतंगराव कदम स्मृती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.ताकवले म्हणाले,पतंगराव यांना स्वप्नपूर्तीचे वरदान लाभले होते. स्वप्न पाहायचे आणि ते सत्यात उतरविण्यासाठी जीवाचे रान करायचे हा त्यांचा स्वभाव होता, असे नमूद करून ताकवले म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील,बापूजी साळुंके यांनी ग्रामीण भागात शिक्षण संस्था काढल्या. पतंगराव कदम यांनी महानगरात शिक्षण संस्था काढून त्याच्या शाखा - उपशाखा ग्रामीण भागापर्यंत नेल्या. तंत्रज्ञान हे क्रांतीचे कारण असले तरी तंत्रज्ञानाचा वापर ज्या माणसाकडून केला जातो.त्याची बुध्दीमत्ता ही अधिक महत्त्वाची असते.विश्वजीत कदम म्हणाले,पतंगराव कदम यांनी शून्यातून आयुष्याची उभारणी केली. स्वत:ला शिक्षण घेताना आलेल्या अडचणी गरीब मुलांना येऊ नयेत यासाठी त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली.भविष्यात शिक्षण संस्थांसमोर अनेक आव्हाने उभी राहणार आहेत. शिक्षण संस्थांसमोर येणा-या आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे. तसेच त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी कटिबध्द राहणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उत्तेकर व डॉ.ज्योती मंडलिक यांनी केले.तर डॉ.एम.एस.सगरे यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेPatangrao Kadamपतंगराव कदमRam Takwaleराम ताकवाले