ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. २ - विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, माजी आमदार विलास लांडे यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे राष्ट्रवादीला बंडखोरीमुळे ही निवडणूक अडचणीची ठरणार आहे.