शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम, विरोधक ठरले निष्प्रभ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 02:11 IST

बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत स्थानिक पातळीवरील पुढा-यांच्या पॅनलमध्ये लढत झाली.

बारामती : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत स्थानिक पातळीवरील पुढा-यांच्या पॅनलमध्ये लढत झाली. आज जाहीर झालेल्या निवडणूक निकालामध्ये १३ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. गडदरवाडीच्या सरंपचपदावर ३२ वर्षानंतर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. या ठिकाणी काकडे गटाची सत्ता होती.पळशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती भाऊसाहेब करे यांना पराभवाचा धक्का बसला.मोरगांवमध्ये राष्ट्रवादीच्याच दोन गटात लढत झाली. या ठिकाणी ढोले गटाची सत्ता उलथून माजी सरपंच पोपट तावरे यांच्या गटाने ग्रामपंचायतीची सत्ता मिळविली. लोणी भापकरमध्ये रवी भापकर यांच्या गटाचा पराभव झाला. काºहाटीमध्ये १० वर्र्षांपासून सत्तेत असणाºया पदाधिका-यांचा पॅनल पराभूत झाला. माजी पंचायत समिती सदस्य राजेश जाधव यांच्या पत्नीला पराभवाचा धक्का बसला. तर सेवानिवृत्त शिक्षक बबनराव जाधव यांच्या पॅनलने अनपेक्षीतरित्या बहुमत मिळविले. सर्वात लक्षवेधी ठरलेल्या पणदरेच्या निवडणुकीत भैरवनाथ पॅनलने १५ पैकी १४ जागा जिंकून सिद्धेश्वर पॅनेलचा पराभव केला. मात्र, सरपंचपदाच्या निवडणुकीत सिद्धेश्वर पॅनेलच्या मीनाक्षी संभाजी जगताप या विजयी झाल्या. गडदरवाडी ग्रामपंचायतीमध्ये ३३ वर्षांनंतर राष्टÑवादीच्या गटाने विजय मिळवून सरपंचपद काबिज केले.वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आंबामाता ग्रामविकास पॅनलने १३ पैकी सात जागा जिंंकल्या. मात्र, विरोधी अंबामाता परिवर्तन पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार नंदा राजकुमार सकुंडे या विजयी झाल्या. मासाळवाडीच्या निवडणुकीत बारामती बाजार समितीचे संचालक मुरलधीर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ नायकोबा बुवाजीबाबा जनसेवा विकास पॅनेलने सदस्यपदाच्या ८ पैकी ४ जागा जिंकल्या. मात्र, विरोधी गटाच्या भैरवनाथ पॅनलच्या भाग्यश्री सोमाजी ठोंबरे या सरपंचपदी विजयी झाल्या.पणदरे : परस्पर विरोधी दावेपक्षाचा प्रत्यक्ष निवडणुकीत सहभाग होता. गावपातळीवरील या निवडणुका होत्या. पणदरेच्या निवडुन आलेल्या सरपंच आमच्या पक्षाच्या विचाराच्या आहेत, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी हा दावा खोडून काढत १३ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेच वर्चस्व मिळविले आहे.पणदरेच्या सरपंच राष्ट्रवादीच्याच विचारांच्या आहेत. त्यांनी मते मागताना छापलेल्या पत्रकारवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो होते. तसेच त्यांना या निवडणुकीत तेथील राष्ट्रवादी दिग्गज नेत्यांनी पाठबळ दिले. त्यामुळे त्या निवडून आल्या. त्यांच्या मुलाने गेल्या पाच वर्षांत उपसरपंच म्हणून काम पाहताना राष्ट्रवादीच्याच विचाराने काम पाहिले आहे, असे होळकर म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक