शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप मोहिते यांच्यावर दाखल गुन्हावरून राष्ट्रवादीच्या २७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 20:49 IST

खेड तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

पुणे : मराठा आरक्षणाची मागणी करताना माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून होणार खोट्या गुन्ह्यात असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा परिषद, पंचायत समिती, व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे तालुका अध्यक्षांकडे सुपूर्द केले, अशी माहिती चाकण येथील बाजार समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी दिली. त्यामुळे खेड तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई पानसरे, दीपाली काळे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, उपसभापती सुगंधा शिंदे, बाजार समितीचे राष्ट्रवादीचे संचालक विलास कातोरे, नवनाथ होले, चंद्रकांत इंगवले, धैर्यशील पानसरे, अशोक राक्षे, धारू गवारी, सुरेखा टोपे, विठ्ठल वनघरे, विनायक घुमटकर, राजूभाई काझी, सयाजी मोहिते हे १३ संचालक, पंचायत समितीचे अरुण चौधरींसह चार सदस्य, चाकण नगर परिषदेचे विरोधीपक्ष नेते जीवन सोनवणे, नगरसेवक वृषाली देशमुख, मेनका बनकर, स्नेहा भुजबळ, अनिता कौटकर, संगीता बिरदवडे, अश्विता कुऱ्हाडे, प्रकाश भुजबळ या २७ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रित्या आपापल्या पदाचे राजीनामे तालुका अध्यक्षांकडे दिले आहेत. यावेळी प्रदीप गारटकर म्हणाले, “मागील वर्षी दि. ३० जुलै २०१८ रोजी चाकण मराठा मोर्चाचे आंदोलन झाले, त्या मोर्चात काही समाज कंटकांनी याला हिंसक वळण दिले. गेल्या एक वर्षांपासून पोलीस प्रशासन याचा तपास करीत आहे. दिलीप मोहितेंना समाज कंटक म्हणून शोधून काढणे हे हास्यापद आहे. या मागे राजकारण असल्याचे प्रत्येक व्यक्ती खासगीत बोलत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेत डॉ. अमोल कोल्हे निवडून आल्याने विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. एवढी अद्ययावत पोलीस यंत्रणा असताना नेमके विधान सभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच हा तपास कसा पूर्ण झाला हा प्रश्न आहे. कार्यकर्त्यावर अन्याय होत असताना अन्यायाविरुद्ध लढण्याचे हे सकल मराठा समाजाचे काम आहे. त्यांच्यावर झालेल्या या अन्यायाचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र निषेध करीत आहोत.” 

टॅग्स :ChakanचाकणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNCPराष्ट्रवादी काँग्रेस