शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरमध्ये राष्ट्रवादीला धक्का; शिवसेनेचा उपनगराध्यक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 17:07 IST

आपला माणूस आपली आघाडी व राष्ट्रवादीची मते फुटली...

ठळक मुद्देकास्टिंग वोटच्या आधारे १0 मते घेऊन शिवसेनेचे दीपेशसिंह परदेशी उपनगराध्यक्षपदी

जुन्नर : जुन्नर नगर परिषदेच्या  उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत  आपला माणूस आपली आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटल्याने जुन्नरमध्ये शिवसेनेने उपनगराध्यक्षपद खेचून आणले.शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना समसमान प्रत्येकी ९ मते पडल्याने नगराध्यक्षांनी बजाविलेल्या कास्टिंग वोटच्या आधारे १0 मते घेऊन शिवसेनेचे गटनेते दीपेशसिंह परदेशी उपनगराध्यक्षपदी निवडून आले. ९ मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनाली म्हस्के यांना पराभवाला सामोरे जावे लागले. उपनगराध्यक्षपदी परदेशी यांची निवड झाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली होती. निवडणुकीसाठी दीपेशसिंह परदेशी, मोनाली म्हस्के, सना मंसुरी यांचे  अर्ज आले होते. सना मंसुरी यांनी अर्ज मागे घेतल्याने परदेशी व म्हस्के  यांच्यात लढत झाली.  नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे शाम पांडे नगराध्यक्षपदी निवडून आले होते. परंतु सभागृहात एकूण १७ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, शिवसेनेचे ५ तर आपला माणूस आपली आघाडीचे ४ नगरसेवक होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने स्वत:ची ५ मते, आघाडीची २ मते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे १ मत आपल्याकडे वळवून एकूण ८ मते मिळविली. नगराध्यक्षांनादेखील नगरसेवकाबरोबर स्वत:चे १ मत देण्याचा अधिकार असल्याने दीपेश परदेशी यांना ९ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या  उमेदवार मोनाली म्हस्के यांना राष्ट्रवादी काँग्रेसची ७ मते मिळाली, तर आपला माणूस आपली आघाडीची २ मते मिळाली. परिणामी त्यांनादेखील ९ मते मिळाल्याने दोन्ही उमेदवारांना समसमान ९ मते मिळाली. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची पद्धत महाराष्ट्रात सुरू झाल्यावर नगराध्यक्ष यांना कास्टिंग वोट देण्याचा  विशेषाधिकार शासनाने बहाल केला होता. त्याप्रमाणे  नगराध्यक्ष  शाम पांडे यांनी कास्टिंग वोट दीपेश परदेशी यांच्या  बाजूने दिले. परदेशी यांची  १० मते झाल्याने त्यांचा विजय झाला.   शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, माजी पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, गणेश कवडे, शहरप्रमुख  चंद्रकांत डोके, शाम खोत, अतुल परदेशी, अंबर परदेशी, आनंद परदेशी, जयूशेठ परदेशी आदी मान्यवर तसेच शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.  ........

1 - राष्ट्रवादी काँगेसच्या तसेच आपला माणूस आपली आघाडीच्या काही नगरसेविका अर्थपूर्णरीत्या ‘नॉट रीचेबल’ असल्याचे तसेच शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे  सांगण्यात येत होते. हे सर्वच नगरसेवक थेट निवडणुकीपूर्वी सभागृहात दाखल झाले.

2- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका समीना शेख यांची भूमिका नेहमीच पक्षविरोधी राहिली आहे. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघनप्रकरणी त्यांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव अगोदरच जिल्हाधिकारी यांचेकडे प्रलंबित आहे.

3- या निवडणुकीत देखील पक्षाचा व्हिप बजावला होता. तो झुगारल्याने पुन्हा त्यांचे पद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांनी सांगितले

टॅग्स :Junnarजुन्नरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक