शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

...त्यामुळे दिवाळी सणाचा नेहमीचा शिरस्ता मोडावा लागला; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 15:06 IST

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची कार्यकर्त्यांसाठी पोस्ट

बारामती: बारामतीत दरवर्षी दिवाळीत पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी, दिवाळी शुभेच्छा देण्यास राज्यातून कार्यकर्ते येतात. या रांगेत बड्या राजकारण्यांपासून कार्यकर्ते, सामान्य नागरिकांचा समावेश असतो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा भेटीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे खासदार सुळे या भावनावश झाल्या आहेत. कोरोनामुळे सर्वांच्या सुरक्षिततेसाठी मनावर दगड ठेऊन नेहमीचा भेटीगाठीचा शिरस्ता मोडणे भाग आहे. आपण हे समजून घ्याल असा आम्हाला विश्वास असल्याचे खासदार सुळे यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.खासदार सुळे म्हणतात, नमस्कार, आपण सर्वजण दिवाळीचा सण साजरा करतोय. दिवाळीच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आदरणीय पवार साहेब आणि कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीला आवर्जून येतात. गेल्या काही दशकांपासून पवार कुटुंबीय आणि जनतेतील नात्याचे हे स्नेहबंध अधिक घट्ट करणारा हा शिरस्ता कायम आहे.दिवाळीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांचे प्रेम, शुभेच्छा, आशीर्वाद आम्हाला लाभतात. अर्थात हेच तर आम्हा सर्वांचं बळ आहे,जे आम्हाला वर्षभर पुरतं. पण यावर्षीचा सण हा नेहमीसारखा नाही.दिवाळीचा आनंद साजरा करताना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यावर काही मर्यादा आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या मर्यादांचे भान सर्वांनाच राखावे लागणार आहे. यामुळेच मनावर दगड ठेवून,नेहमीचा शिरस्ता मोडत आम्ही पवार कुटुंबीयांनी या दिवाळीत कोणालाही भेटायचं नाही, असं ठरविलं आहे. आम्हा सर्वांना तुमची आपुलकी,प्रेम,स्नेह व आशीर्वाद यांची उणीव भासेल,याची आम्हाला जाणीव आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी भेटीगाठीचा दरवर्षीचा हा शिरस्ता मोडणं भाग आहे. आपण हे समजून घ्याल असा आम्हाला विश्वास आहे. यापुर्वीही पवार कुटुंबीयांच्या वतीने याबाबतचे निवेदन प्रकाशित करण्यात आले होते. जर नजरचुकीने कोणाच्या वाचण्यात ते निवेदन आले नसेल, तर पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की, यंदाच्या दिवाळीत कृपया कोणीही भेटीसाठी बारामतीला येऊ नये. कोरोनाचे संकट टळल्यानंतर आपण सर्वजण पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने हा दिवाळीचा उत्सव साजरा करु. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आरोग्यदायी आणि सुखसमृद्धी आणणारी असो , अशा शुभेच्छा देखील खासदार सुळे यांनी दिल्या आहेत

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDiwaliदिवाळी