शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एनसीएलने तयार केले 'बायोपोलिमर नॅनोकॉटिंग' मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:56 IST

एनसीएलने तयार केलेल्या मास्कची कार्यक्षमता ही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मास्कपेक्षा सुधारीत

ठळक मुद्देमहिनाअखेरपर्यंत एका दिवसाला एक लाख मास्क तयार करण्याची योजना

पुणे:  राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळा (एनसीएल) या संशोधन संस्थेने बायोपोलिमर नॅनो कॉटिंग असलेले वैद्यकीय श्रेणीचे विशिष्ट मास्क विकसित केले आहेत. डॉ. सय्यद दस्तगीर डॉ. महेश धारणे आणि डॉक्टर शुभांगी उंबरकर यांच्या नेतृत्वाखालील संशोधन गटाने एनसीएलने पेटेंट घेतलेल्या जीवाणूंच्या सेल्युलोजचा वापर नॅनोकॉटिंगसाठी केला आहे.एनसीएलने तयार केलेल्या मास्कची कार्यक्षमता ही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मास्कपेक्षा सुधारीत आहे. या संशोधनात सूक्ष्मजीव वाढीचे निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी सुती कापड जिवाणू सेल्युलोज द्रावण आणि नॅनो मटेरियलमध्ये बुडून ठेवण्यात आले होते. या अभ्यासात जिवाणूंची वाढ रोखण्यात आली असून फिल्टर म्हणून मास्कमध्ये महत्वपूर्ण घटकांचा वापर करण्यात आला आहे. या संशोधनासाठी वैज्ञानिकांनी स्पन बॉण्ड पॉलीप्रोपीलीन वैद्यकीय श्रेणीच्या कपड्यांचा वापर करून जिवाणू फिल्डरेशनची कार्यक्षमता, द्राव्य घटकांच्या फिल्टरेशनची कार्यक्षमता , श्वासोच्छवास, ज्वलनशीलता अशा विविध मापदंडानुसार अभ्यास करण्यासाठी नमुना मास्क तयार केले. कोयंबतूर येथील दक्षिण भारत वस्त्र संशोधन संघटना (सिट्रा) या शासकीय मान्यताप्राप्त वैद्यकीय वस्त्रोद्योगासाठी प्रमाणित करणाऱ्या नोडल एजन्सीने या मास्कच्या नमुन्याची तपासणी केली. त्याचप्रमाणे 'अमेरिकन सोसायटी ऑफ टेस्टिंग अण्ड मटेरियल्स'च्या मास्क संरक्षक मानांकनानुसार जिवाणू फिल्टरेशन कार्यक्षमता तपासणीसाठी स्टेफीलोकोकस ऑरियस या मानवी रोगकारकाचा प्रयोग केला तेव्हा मास्कची कार्यक्षमता ९९.९ टक्के एवढी निदर्शनास आली. रुग्णांच्या रक्त आणि शरीरातील स्रावांच्या शिडकाव्यापासून हा मास्क किती बचाव करू शकतो हे पाहण्यासाठी सिट्राने घेतलेल्या चाचणी मध्ये सुद्धा हा मास्क पात्र ठरला आहे.

एनसीएलने पुण्यातील सेट लॅब इंडिया या लघु आणि मध्यम उद्योग कंपनीला या तंत्रज्ञानाचा परवाना दिला आहे. येत्या काही दिवसात सेट लॅब उत्पादन सुरू करणार असून दिवसाला पाच हजार मास्कपासून सुरुवात करून या महिनाअखेरपर्यंत एका दिवसाला एक लाख मास्क तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे,असे एनसीएलतर्फे कळविण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलResearchसंशोधनdoctorडॉक्टर