शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मावळमध्ये राष्ट्रवादीला मनसेची रसद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 02:20 IST

मनसेने लोकसभेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मधुकर ठाकूर उरण : मावळ लोकसभेच्या निवडणुकीत आता राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मदतीसाठी मनसेने धाव घेतली आहे. मावळ लोकसभा मतदार संघात असलेल्या मनसेच्या जवळपास सव्वा लाख मतांची रसद पार्थ पवार यांना मिळणार असल्याने राष्ट्रवादीमध्ये सध्या तरी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मनसेने लोकसभेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला गाडा, उमेदवार पाडाच्या निर्णयाची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मदतीसाठी मनसेने धाव घेतली आहे. गुरु वारी कळंबोळी-पनवेल येथे मनसे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार अन्य पदाधिकारी आणि मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्यात बैठक झाली. बैठकीत मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना मनसेने बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी दिली.मावळ लोकसभा मतदार संघात मनसेची जवळपास सव्वालाख मते आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत शेकाप-मनसे युतीच्या लक्ष्मण जगताप यांना उरण, पनवेल, कर्जत मतदार संघातून एक लाख ९४ हजार ८०६ मते मिळाली होती. त्यापैकी ५५ ते ६० हजार मते मनसेची होती. मावळ, पिंपरी, चिंचवड या तीन विधानसभेतही मनसेची मतदार संख्या ७० हजारांपर्यंत आहे. त्यामुळे मनसेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीला जवळपास सहा विधानसभा मतदार संघातून सव्वालाख मते मिळतील, असा अंदाज मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी व्यक्त केला आहे. मागील उरण विधानसभेच्या निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील यांना ५५ हजार मते मिळाली होती. उरणमध्ये विधानसभा निवडणुकीत मनसेने साथ सोडल्याने शेकापला ८५० मतांनी पराभव पत्करावा लागला होता.राष्ट्रवादीचे पार्थ पवार याच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा घेण्याचीही मनसेकडून मागणी करण्यात आली आहे. मावळमध्ये राष्ट्रवादीला मनसेची रसद मिळणार असल्याने पार्थ पवारांना निवडणुकीत दिलासा आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारmaval-pcमावळ