शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत चुरस; २२ एप्रिलला निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 04:02 IST

पक्षाचे नेते अजित पवार यांना शहराच्या मध्यभागात पक्षाला प्रवेश करून द्यायचा असून, त्यासाठी ते योग्य नावाच्या शोधात आहेत.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची निवड येत्या २२ एप्रिलला होणार आहे. त्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत २९ एप्रिलला पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. खासदार वंदना चव्हाण यांनी शहराध्यक्षपदातून मुक्त करण्याची विनंती पक्षाला केल्यामुळे हे पद रिक्त होत असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठीच चुरस आहे.पक्षाचे नेते अजित पवार यांना शहराच्या मध्यभागात पक्षाला प्रवेश करून द्यायचा असून, त्यासाठी ते योग्य नावाच्या शोधात आहेत. माजी महापौर प्रशांत जगताप, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यापासून ते स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, दिलीप बराटे, बाबूराव चांदेरे आदी या पदासाठी इच्छुक आहेत. त्याशिवाय महिला नगरसेवकांनीही या पदासाठी काम करण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यात माजी महापौर वैशाली बनकर यांचा समावेश आहे.खुद्द अजित पवार यांनीही शहराध्यक्षपदासाठी काम करण्यास इतकेजण इच्छुक असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले असल्याची चर्चा आहे.पक्षाच्या शहर शाखेने निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे; मात्र मध्यंतरी हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीमध्ये सर्वच शहरांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या. खासदारपदाकडे लक्ष द्यायचे असल्यामुळे शहराध्यक्षपदाची जबाबदारी नको, असे पक्षाला कळवले होते. त्यामुळे आता २२ एप्रिलला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शहर शाखेने पाठवलेल्या नावांबाबत चर्चा होऊन त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. २९ तारखेला पक्षाच्या बैठकीत तशी घोषणा केली जाईल.- वंदना चव्हाण, खासदार

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे