मतदार दिवस यशस्वीपणे साजरा करण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली १५ जणांची विशेष समिती नियुक्त करण्यात आली असून यामध्ये वेगवेगळ्या कार्यालयाचे प्रमुख सदस्य म्हणून नियुक्त केलेले आहेत. त्याअनुषंगाने शिरूर तालुक्यामध्ये २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यासाठी वक्तृत्व, निबंध, लेखन, चित्रकला , रांगोळी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धा वैयक्तिक स्वरूपात घेण्यात आल्या असून कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने या स्पर्धा पार पडल्या.
तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी एल ओ) यांनी मतदान कार्डाचे वाटप केले. १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवीन तरुण मतदारांची नोंदणी करून घेतली. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार नोंदणी किती महत्त्वाची आहे अशी जनजागृती करण्यात आली. या जनजागृती मध्ये ज्येष्ठ नागरिक तरुण महिला व दिव्यांग मतदार यांना सहभागी करून घेतले. इयत्ता ९ वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांमध्ये मतदान नोंदणी जनजागृती करण्याचे काम शाळा व महाविद्यालयांमध्ये करण्यात आले. यासाठी शाळा महाविद्यालयांमधून मतदानासाठीची प्रतिज्ञा घेण्यात आल्याचे मुख्याध्यापक मारुती कदम यांनी सांगितले.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने भारत निवडणूक आयोगाने मोबाइलमध्ये e-EPIC (electonic-Electrol Photo Identity Card सुविधा सुरू केली असून यामाध्यमातून प्रत्येक मतदारास मतदान कार्ड व त्यासंबंधीची माहिती डाऊनलोड करून पाहता येईल.
एल. डी.शेख तहसीलदार, शिरूर
प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी शालेय पातळीवरच विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे महत्त्व पटवून जनजागृती करणे गरजेचे आहे. या जनजागृतीत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मतदार दिनाची शपथ घेतली याचे समाधान मिळाले.
मारुती कदम मुख्याध्यापक तथा सदस्य मतदार विशेष नियोजन समिती.
भांबर्डे ( ता.शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची शपथ घेतली.