शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचे दर आवाक्यात ठेवण्याच्या कसरतीत ऊस उत्पादकांना दुय्यम स्थान : संभाजीराव कडु-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 15:42 IST

डॉ. डी. जी. हापसे अ‍ॅण्ड असोसिएट्स तर्फे आयोजित ऊस पीक पद्धती आणि शाश्वत ऊस शेती उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कडु-पाटील यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देऊस पीक पद्धती आणि शाश्वत ऊस शेती उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावर कार्यशाळाउत्पादनाशी निगडीत शाश्वत तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे : के. पी. विश्वनाथन

पुणे : साखरेचे दर ग्राहकांच्या आवाक्यात ठेवण्याच्या कसरतीमध्ये सरकारकडून शेतकरी आणि साखर उत्पादकांना दुय्यम स्थान दिले जाते. साखरेचे दर स्थिर राहत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या बाजारपेठेतील परिस्थिती भीतीदायक असून तंत्रज्ञानाच्या सहकार्याशिवाय कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त उत्पादन होणार नाही. ऊस लागवडीचा खर्च कमी होऊन उतारा वाढला, तरच साखर कारखाने स्थिर स्थावर होतील, असे मत साखर आयुक्त संभाजीराव कडु-पाटील यांनी व्यक्त केले. डॉ. डी. जी. हापसे अ‍ॅण्ड असोसिएट्स तर्फे आयोजित ऊस पीक पद्धती आणि शाश्वत ऊस शेती उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कडु-पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु के. पी. विश्वनाथन, नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅप शुगर फॅक्टरीजचे कार्यकारी संचालक डॉ. प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात नागवडे म्हणाले, की ऊस उत्पादन वाढीसाठी केवळ शेतकऱ्यांनी विशेष प्रयत्न करणे पुरेसे ठरणार नाही, तर त्यांच्या प्रयत्नांना केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांचे पाठबळ मिळाले पाहिजे. घरगुती वापरासाठी स्वस्त दरात साखर उपलब्ध व्हावी, असे कारण देऊन साखरेचे दर नियंत्रणात ठेवले जातात. प्रत्यक्षात मात्र देशात उत्पादीत होणाऱ्या एकूण साखरेपैकी केवळ साधारणपणे २५ ते ३० टक्के साखर घरगुती कारणासाठी वापरली जाते, तर उर्वरीत ७० ते ७५ टक्के साखरेचा वापर अन्य उद्योगांसाठी केला जातो. हे अन्य उद्योजक कमी दरातील साखर खरेदी करुन अमाप नफा कमवतात. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांच्या पैश्यांसाठी आंदोलने करावी लागतात, ही परिस्थिती बदलली पाहिजे. विश्वनाथन म्हणाले, की प्रती हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन घेणे ही स्पर्धा केवळ पारितोषिकापुरती ठिक आहे. मात्र, या स्पर्धेपेक्षा आपण शाश्वत विकासासाठी, जागतिक पातळीवर टिकण्यासाठी उत्पादनाशी निगडीत शाश्वत तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे. 

टॅग्स :Puneपुणे