शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ

By नितीन चौधरी | Updated: November 20, 2024 06:48 IST

एका राजकीय पक्षाला शंका आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे तक्रार केली.

पुणे : नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा हे बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघात मतदान करणार आहेत. काय विश्वास बसत नाही? होय, हे खरे आहे. त्यामुळे कोथरूड मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. थांबा... बातमी पूर्ण वाचा.

मतदारयादीत नामसाधर्म्य असलेली अनेक नावे असतात. त्यामुळे गोंधळही उडतो. त्यावरून अनेक गैरसमजही होतात. असाच गैरसमज सध्या कोथरूड मतदारसंघात झाला आहे. 

मोदी, गांधी, पवार, शहा ही सर्व मंडळी कोथरूडमध्ये मतदान कसे करणार, यावरून हा गोंधळ उडाला आहे. मात्र, यात नामसाधर्म्य हेच मूळ कारण आहे. 

या मतदारसंघात नरेंद्र धीरजलाल मोदी, राहुल अनिल गांधी, शरद रामचंद्र पवार, अमित अशोक शहा, एकनाथ सोमनाथ शिंदे, अजित आत्माराम पवार, संजय एकनाथ राऊत, आदित्य प्रभाकर ठाकरे व रोहित राजेंद्र पवार हे मतदार आहेत. 

या मतदारांना मतदार चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. त्यावरून हा गोंधळ उडाला आहे. मात्र, संपूर्ण नाव तपासले असता तो गोंधळ दूर होतो. 

एका राजकीय पक्षाला शंका आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे तक्रार केली. दिवसे यांनी कोथरूड मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाडे यांना सत्यता पडताळणीचे आदेश दिले. त्यानुसार गाडे यांनी संबंधित केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्याकडून याची पडताळणी केली. त्यानुसार हे सर्व मतदार असल्याचे आढळले आहे.

नामसाधर्म्य असल्याने सुरुवातीला गोंधळ उडू शकतो. मात्र, पूर्ण नाव वाचल्यास नाव वेगळे असल्याचे स्पष्ट होते. या मतदारांची पडताळणी केली आहे. ते योग्य असल्याचे आढळले आहे. - डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kothrud-acकोथरुडPuneपुणे