शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: पुनाळेकर यांनी सनातनचा साधक म्हणून दिला सल्ला- सीबीआय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 06:49 IST

सीबीआयच्या वकिलांचा युक्तिवाद

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी संशयित आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला आहे, असा युक्तिवाद सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी सोमवारी केला.अ‍ॅड़ पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर विशेष सत्र न्यायाधीश आऱ एम़ पांडे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे़ या सुनावणी दरम्यान त्यांनी हा युक्तीवाद केला़ याप्रकरणी सरकारी वकिलांचा युक्तीवाद अद्याप बाकी असून पुढील सुनावणी १९ जून रोजी होणार आहे.सीबीआयचे वकील सूर्यवंशी यांनी सांगितले की, डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद काळसकर याचा जबाब कर्नाटक एसआयटीने नोंदविला आहे. त्या जबाबात त्याने पूर्ण शस्त्र नष्ट न करता त्याचे काही सुट्टे भाग करून ठाणे येथील खाडीत फेकून द्यावे असा सल्ला अ‍ॅड. पुनाळेकर यांनी दिला असल्याचे म्हटले आहे. अ‍ॅड़ पुनाळेकर यांनी वकिली क्षेत्राची लक्ष्मणरेषा ओलांडून एक साधक म्हणून दुसऱ्या साधकाला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जे उर्वरित शस्त्राचे भाग दुसºया गुन्ह्यात वापरायचे होते का असा प्रश्न अ‍ॅड. सूर्यवंशी केला.डॉ. दाभोलकर यांना तुमचा दुसरा गांधी करू असेही धमकाविण्यात आल्याचे अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. डॉ. दाभोलकर यांना मारण्यासाठी आरोपींनी संगनमताने मोठा कट रचून तो पूर्णत्वास नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरSanatan Sansthaसनातन संस्था