शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कसबा पेठ ते शिवाजीनगर जोडणा-या पुलास शाहु महाराजांचे नाव द्यावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 21:45 IST

पुण्यात छत्रपती शाहु महाराज यांचा शैक्षणिक वसा आणि वारसा असताना भाजपचे आमदार व मनपा सत्ताधारी हे नावाचे राजकारण करत आहेत.

ठळक मुद्देशाहु महाराज सेतु यांचे नाव देण्याचा ठराव पुलाचे काम सुरु केले त्यावेळी मंजूर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या नाव समितीने ठराव करुन कसबा पेठ कुंभारवाडा ते शिवाजीनगर जोडणा-या पुलास राजर्षी छत्रपती शाहु महाराज सेतु असे नाव द्यावे,अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. त्याकरिता त्या पुलावर ब्रिगेडच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शाहु महाराज सेतु यांचे नाव देण्याचा ठराव पुलाचे काम सुरु केले. त्यावेळी मंजूर करण्यात आले आहे. मात्र स्थानिक पुढारी, आमदार पुलाच्या नामकरणाला विरोध करीत असून त्या पुलाचे नाव जाणीवपूर्वक बदलुन दुसरे नाव ठेवण्याचा आग्रह धरत आहेत. त्याला ब्रिगेडच्यावतीने विरोध करण्यात आला आहे. महाराष्ट्रात राजर्षी छतपती शाहु महाराज हे आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या समता, समानता, बंधुता या पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांचा जागर सातत्याने होत असतो. पुण्यात छत्रपती शाहु महाराज यांचा शैक्षणिक वसा आणि वारसा असताना भाजपचे आमदार विजय काळे व मनपा सत्ताधारी हे नावाचे राजकारण करीत आहेत. नाव समितीत मंजूर होवून देखील त्यास भाजप आमदार विरोध करीत असून त्यांनी शाहु महाराजांच्या नावाऐवजी संत गोरोबा कुंभार यांचे नाव देण्याचे पत्र पालिकेला दिले आहे.  संत गोरोबा काका कुंभार यांच्या नावाला ब्रिगेडचा विरोध नसून स्थानिक राजकारण्यांकडून होणा-या नाव बदलण्याच्या राजकारणाला विरोध असल्याचे ब्रिगेडने प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे.छत्रपती शाहु महाराज सेतु यांचे नाव देण्याचा ठराव मंजुर करुन पैसे उपलब्ध करुन दिले असताना काळे यांनी ते नाव बदलु नये. अन्यथा ब्रिगेडच्यावतीने तीव आंदोलन छेडणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, सुभाष जाधव, महेंद्र जाधव, मंदार बहिरट, सचिन जोशी, संजय चव्हाण आदी पदाधिका-यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपा