शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीत नाव नोंदवा आॅनलाईन : महिना अखेरपर्यंत संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 16:01 IST

मतदार यादीत आॅनलाईन पद्धतीने अर्ज करुन नाव नोंदविता येणार असून, मतदार अर्ज योग्य कागदपत्रांसह संबंधित विधानसभा मतदार नोंदणी कार्यालयाकडे देखील जमा करता येईल.

ठळक मुद्देगृह निर्माण संस्थांना मोहीम सहभागी होण्याचे आवाहनआगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम महिन्याच्या दर रविवारी मतदान केंद्रात, तर मंगळवारी महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी मोहीम

पुणे : मतदार यादीत आॅनलाईन पद्धतीने अर्ज करुन नाव नोंदविता येणार असून, मतदार अर्ज योग्य कागदपत्रांसह संबंधित विधानसभा मतदार नोंदणी कार्यालयाकडे देखील जमा करता येईल. नागरिकांनी येत्या महिना अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक शाखेतर्फे हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार या महिन्याच्या दर रविवारी मतदान केंद्रात, तर मंगळवारी महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या शिवाय गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांना देखील मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषित करण्यात आले आहे. तसेच त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गृह निर्माण संस्थांमधील मतदार नोदंणी, नावातील बदल, मयत व्यक्तींची नावे वगळणे, नावातील चुकीची दुरुस्ती करणे आणि स्थलांतरीतांची नावे कळवण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. नागरिकांना एनव्हीएसपी डॉट इन या संकेतस्थळावर मतदार नोंदणीचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे देखील दाखल करता येतील. तसेच विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज आणि कागदपत्रे भरुन नाव नोंदणी, पत्ता बदल, नावातील दुरुस्ती अथवा बदल करुन घेता येणार आहे. या महिना अखेरी पर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे. गृह निर्माण संस्थांच्या अध्यक्ष आणि सचिवांना १८ ते १९ वयोगटातील मतदारांची नाव नोंदणी करण्याचे विशेष आवाहन करण्यात आले आहे. या शिवाय दिव्यांग व्यक्तींची माहिती देखील संस्थांनी द्यावी. त्यामुळे दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी आणि सुविधा देणे प्रशासनाला शक्य होईल. संबंधित गृह संस्थेतून स्थलांतरीत झालेल्या व्यक्तींची देखील नावे कळवावित असे आवाहन निवडणूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. ---------------कागदपत्रे ुवयाचा पुरावा : जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेची नोंद असलेली गुणपत्रिका, पासपोर्ट, वाहन परवाना, आधार कार्ड यापैकी कोणतेही एक.रहिवासी पुरावा : शिधापत्रिका, बँक आणि पोस्ट पासबुक, पासपोर्ट, वाहन परवाना, नजीकच्या महिन्याचे टेलिफोन अथवा वीज बिल, पासपोर्ट, आधारकार्ड या पैकी कोणतेही एक. आॅनलाईन मतदार नोंदणीसाठी अर्जदाराचे छायाचित्र २ एमबी पेक्षा जास्त नसावे. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूक