शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मसाज सेंटरच्या नावाखाली हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय करणारे दोन जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 06:40 IST

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय करणा-या दोघांना येरवडा पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

पुणे : कल्याणीनगर येथे स्पा, मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय करणा-या दोघांना येरवडा पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. स्पा सेंटरमधील सहा थाई तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी (रेस्क्यू होम) महिला संरक्षणगृहात करण्यात आली आहे.या प्रकरणी अंकित नवीन शहा (वय २७, रा. बंगला नं. १४, क्लोव्हर आर्च, विमाननगर) व फरहान नेहान फारूख (वय २४, रा. सिलोसिया अपार्टमेंट, वाघोली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. कल्याणीनगरसारख्या उच्चभू्र परिसरात थाई स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली हा हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू होता.या घटनेमुळे शहरातील उच्चभ्रू परिसरात स्पा व मसाज सेंटरच्या नावाखाली छुप्या मार्गाने होणाºया वेश्याव्यवसायाकडे पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास यंग बॉडी स्पा, एफमॉल, शॉप नं. ८, ९, १० या ठिकाणी शॉपमध्ये स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली थायलंड येथील तरुणींकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार तत्काळ पोलीस उपनिरीक्षक अनिल लोहार, सहायक पोलीस फौजदाररमेश ओव्हाळ, हवालदार बाळासाहेब बहीरट, कर्मचारी मनोज कुदळे, अशोक गवळी, नवनाथ मोहिते, महिला पोलीस शिवानी जगताप, अक्षता वीसापुरे यांच्यासह मसाज सेंटरवर छापा टाकण्यात आला. फरहान मॅनेजर होता. शॉपमधील खोल्यांमध्ये थायलंड येथील सहा तरुणी सापडल्या. ३५,२०० रुपये, मोबाईल, रजिस्टर व पावती पुस्तक असे साहित्य पोलिसांनी जप्त केले. स्पाचा मालक अंकित शहा यालादेखील घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले.पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शहरातील अवैध धंदे व वेश्याव्यवसाय पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना सर्व वरिष्ठ अधिकाºयांना पूर्वीच दिल्या आहेत. तरीदेखील हे व्यवसाय छुप्या मार्गाने तेजीत सुरूच आहेत. अशा गंभीर प्रकारांबाबत स्थानिक नागरिक वेळोवेळी तक्रारी करतात. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कल्याणी नगरमधील गुन्ह्यामुळे उच्चभ्रू परिसरात पुन्हा वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हाPuneपुणे