शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

Video: आरारारा..! सेलिब्रेशनच्या नावाखाली मित्रांनी केला 'बर्थ डे बॉय'वर अंड्यांचा तुफान मारा

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: December 15, 2020 18:26 IST

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

पुणे : वाढदिवस साजरा करण्याच्या नव्या नव्या पद्धतीसमोर येत आहे.रस्त्यावर तलवारीने, कोयत्याने यांनी केक कापत धिंगाणा घातल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. काहीजणांवर पोलीस गुन्हा देखील दाखल केले जातात. मात्र असे भयानक प्रकार थांबण्याचे काही नाव घेताना दिसत नाही. अशाच  प्रकारे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे काही तरुणांनी आपल्या मित्राचा अजब-गजब प्रकारे वाढदिवस साजरा केला. पण हा धिंगाणा 'बर्थ डे बॉय' सह त्याच्या मित्रांना चांगलाच महागात पडला आहे. 

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे सकलेन नासिर शेख याचा नुकताच १८ वा वाढदिवस होता. यावेळी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या मित्रांनी केक कापल्यानंतर जमलेल्या त्याच्या मित्रांनी एकमेकांना अंडी फेकून मारत परिसरात चांगलाच धुडगुस घातला. नारायणगाव पोलिस ठाण्यात बर्थ डे बॉय आणि त्याच्या ६ मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, नारायणगाव येथील मुक्ताई मंदिर परिसरात सकलेन व त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. इथपर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होते. ;पण त्यानंतर काहीच वेळात सकलेनच्या मित्रांनी त्याला जोरजोऱ्यात अंडी फेकून मारण्यास सुरुवात केली.  या धिंगाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. पोलिसांना ज्यावेळी या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी या तरुणांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे सकलेन आत्तार, साकीर आमीन जमादार, आरमान खालीद शेख, मोईन अकलाक आत्तार, मोसीन फिरोज ईनामदार, जाहिद पिरमहम्मद पटेल. (सर्व रा. मुस्लिम मोहल्ला, नारायणगाव) अशी आहेत. नारायणगाव पोलीस स्टेशनचे दत्तात्रय गुंड यांनी या धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

वाढदिवस साजरा करण्याच्या 'हटके' स्टाईलच्या नावाखाली पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये तलवारी,कोयते यांच्या साह्याने केक कापण्याच्या घटना प्रमाणात घडत आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात तरी ती अशा घटनांना रोखण्यात कमी पडत आहे. या  वाढदिवस साजरा करण्यापाठीमागे परिसरात दहशत निर्माण करण्याचा हेतू असतो.मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड,औरंगाबाद यांसारख्या मोठं मोठ्या शहरापुरते मर्यादित असलेले असे भयानक प्रकार आता गाव व तालुका पातळीवर सुरु झाले आहे. पोलिसांनी लवकर जर अशा प्रवृत्तींना आळा घातला नाहीतर समाज जीवन धोक्यात येणार आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर खाकी वर्दीची जरब बसणे अत्यंत गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :narayangaonनारायणगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस