--
पुणे : मुलींमध्ये नजाकत ही नैसर्गिक असतेच मात्र त्याबरोबर वेळ आल्यावर निखारा बनून त्या अतिशय दाहकही होऊ शकतात, त्यासाठी तुम्ही मानसिक तयारी तशी केली पाहिजे असे मत सहाय्यक पोलिस निरिक्षक आणि मॉडेलिंग आर्टिस्ट प्रेमा पाटील यांनी व्यक्त केले.
गेल्या तीन दिवसांपासून पुण्यामध्ये सुरु असलेल्या मॅड ॲकॅडमीच्या ‘ड्रीम क्रिएटीव्ह आर्ट’ एक्झिबीशनचा आज फॅशन शो ने समारोप झाला. त्यावेळी प्रेमा पाटील यांनी स्वत: फेस पेंटीग करत क्राफ्ट ड्रेस परिधान करून रॅम्प वॉक केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंचल पटेल, रेखा सुगला, आसावरी गांधी, डॉ. प्रियल दोशी, विकास गोसावी उपस्थित होत्या.
आज झालेल्या फॅशन शो मध्ये पाच वर्षाच्या मुलांपासून ते चाळीशीतील महिला-पुरुष सहभागी झाले होते. क्राफ्ट ड्रेसेस आणि फेस पेंटीग करुन रॅम्प वाॅक करत आलेल्या या मॅाडेल्सनी उपस्थितांची मने जिंकली. कोवीड काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे बऱ्याचा महिन्यानंतर पुण्यात असा कार्यक्रम रंगला. पेपर ड्रेस, लेदर ड्रेस, नेट डिझाईन ड्रेसेस अशा अनेक ड्रेसेस परिधान करून रंगीबेरंगी आकर्षक रंगांनी चेहऱ्यावर नक्षीकाम केलेल्या या मॉडेलच्या जलव्याने कार्यक्रम रंगला.
-
चौकट
पेपर ड्रेस ठरले प्रमुख आकर्षण
--
फॅशन शो मध्ये विविध क्राफ्ट ड्रेस सादर झाले त्यामध्ये सर्वात प्रमुख आकर्षण ठरते ते पेपरने व पुठ्यांनी बनविलेला खास ड्रेस. गळ्यापासून पायांपर्यंत फोल्डेड पेपर आणि त्यावर पेपरचीच मोठी फुले अशा आगळ्या वेगळ्या ड्रेस परिधान करून आलेल्या डॉ. नयना यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले. सुमारे महिनाभर या हा ड्रेस तयार करण्यासाठी मेहनत घेतली असून पर्यावरणाबाबत जनजागृतीचा संदेश या ड्रेसच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होता अशी माहिती डिझयनर आसावरी गांधी यांनी दिली.
---
फोटो : ३० पुणे फॅशन डिझाईन
फऱ्ोटो ओळी : - फशन शो मध्ये सहभागी झालेले मॉडेल्स
फोटो ३० पुणे फॅशन पेपर ड्रेस
--
---