शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

खिळेमुक्त झाडे या अभियानाची झाली चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 15:24 IST

झाडांना खिळेमुक्त तसेच वेदना मुक्त करण्याचा विडा पुण्यातील अंघाेळीची गाेळी या संघटनेच्या तरुणांनी उचलला असून, या अभियानाचे अाता चळवळीत रुपांतर हाेत अाहे.

पुणे : अंघाेळीची गाेळी या अापल्या संघटनेमार्फत माधव पाटील यांनी सुरु केलेल्या नेल फ्री पेन फ्री ट्री अर्थात खिळेमुक्त झाडे या अभियानाचे अाता चळवळीत रुपांतर झाले अाहे. चार- पाच तरुणांनी सुरु केलेल्या अभियानात अाता शेकडाे नागरिक सहभागी हाेत अाहेत. पुण्यापासून सुरु झालेले अभियान महाराष्ट्रातील 10 शहरांमध्ये जाऊन पाेहचले अाहे. दर रविवारी विविध भागातील नागरिक सकाळी हाताेडी घेऊन बाहेर पडतात ते झाडांना मारलेले खिळे काढण्यासाठी. झाडांना खिळेमुक्त करुन त्यांना वेदनामुक्त करण्याचा विडा या अंघाेळीची गाेळी या संघटनेच्या कार्यकत्यांनी उचलला अाहे. 

    महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपूर्वी अालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर माधव पाटील या पुण्यातील तरुणाने अापल्या मित्रांसाेबत अंघाेळीची गाेळी हे कॅम्पेन सुरु केले. पाणी वाचवण्यासाठी अापण अाठवड्यातून एकदा अंघाेळीची गाेळी घ्यावी म्हणजेच एक दिवस अंघाेळ न करुन ते पाणी वाचवायचे. या कॅम्पेनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कॅम्पेनचे पाटील यांनी संघटनेत रुपांतर करुन विविध सामाजिक उपक्रम राबविले. दुष्काळाची दाहकता दाखविणारे फाेटाेंचे प्रदर्शन असाे की मग दुष्काळी भागातील मुलांना पुण्यात अाणून त्यांना मामाच्या गावची सफर असाे. अश्या अनेक उपक्रमांमधून निसर्गासाठी माधव पाटील व त्यांचे सहकारी काम करीत अाहेत. या पुढे जात त्यांनी काही महिन्यांपूर्वी नेल फ्री पेन फ्री ट्री अर्थात खिळेमुक्त झाडे हे अभियान सुरु केले. शहरातील अनेक झाडांवर खिळे मारुन विविध जाहीराती लावल्या जातात. त्याचबराेबर अनेक क्लासेसचे बाेर्डही लावले जातात. झाडांना मारलेले खिळे काढून त्यांना त्रासापासून मुक्त करण्याचा विडा अंघाेळीच्या गाेळीने उचलला अाणि बघता बघता माेठा जनसमुदाय त्यांच्या या अभियानात सहभागी झाला. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांपासून ते अायटी कर्मचारी, प्रशासन साऱ्यांनीच या चळवळीत अाता भाग घेतला अाहे. 

    दर रविवारी शहारातील एक भाग निवडून त्या भागातील झाडांना मारलेले खिळे काढण्यात येतात. या रविवारी काेथरुड येथील सिटी प्राईड सिनेमागृहाच्या परिसरातील झाडांवरील खिळे काढण्यात अाले. या ठिकाणच्या जवळपास 30 झाडांवरील 300 हून अधिक खिळे काढण्यात अाले. झाडांच्या संवेदनांची जाणीव माणूस विसरत चालला अाहे, अापल्याच माणसांनी ठाेकलेल्या खिळ्यांकडे अापणच काणाडाेळा करताे. काेथरुडची झाडे खिळेमुक्त ठेवण्याची जबाबदारी एक पुण्याचा नागरिक म्हणून माझी अाहे. असा निर्धार सकाळी या भागात फिरण्यास अालेल्या गाेगडे यांनी केला. 

    याविषयी बाेलताना माधव पाटील म्हणाले, अात्तापर्यंत 10 शहरांमध्ये हे अभियान  पाेहचले अाहे. अाम्हाला हे अभियान महाराष्ट्रभर न्यायचे अाहे. खिळेमुक्त झाडांबराेबरच झाडांना एक मीटर वासाचा अाळा करण्याचा अामचा प्रयास अाहे. पिंपरीमध्ये हे काम सुरु करण्यात अाले अाहे. या माध्यमातून झाडांना जगण्याचा अधिकार देत अाहाेत. अनेक नवीन साथी या प्रवासात जाेडले गेले अाहेत. 

टॅग्स :Puneपुणेkothrudकोथरूडnewsबातम्या