शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

नायगावला बेसुमार वाळूचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:52 IST

वन व महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; झाडांची कत्तल, तस्करीसाठी रस्ते

राजेगाव : नायगाव (ता. दौंड) येथील वन विभागाच्या हद्दीतून खुलेआम वनातील झाडे, मुरूम काढून वाळूचोरीसाठी रस्ते केले जात आहेत आणि वनहद्दीतून वाळूचोरी केली जात आहे; मात्र याकडे हे वनअधिकारी व महसूल अधिकारी साफ डोळेझाक करीत आहे.वन विभागाचे अधिकारी मात्र रस्त्यापुरतीच आमची जागा असून, इतर जागाही खासगी असल्याचे सांगून अंग झटकून मोकळे होत आहेत.नायगाव (ता. दौंड) येथे वन विभागाची जमीन मोठ्या प्रमाणावर आहे. येथील वनअधिकारी व कर्मचारी हे येथील नागरिकांना या वनक्षेत्रात पाऊलही टाकू देत नाहीत. त्यांच्यावर लगेच कार्यवाहीचा बडगा उगारतात. त्यामुळे या क्षेत्रात नागरिक आपला वावर करीत नाहीत; मात्र आज या भागातून खुलेआम येथील वनातील झाडे, मुरूम काढून वाळूचोरीसाठी रस्ते केले जात आहेत आणि वनहद्दीतून वाळूचोरी केली जात आहे; मात्र याकडे हे वनअधिकारी व महसूल अधिकारी डोळेझाक करीत आहे.भीमा नदीपात्रात अनेक महिन्यांपासून बेसुमार चोरून वाळूउपसा चालू आहे. सध्या या ठिकाणी भीमा नदीपात्रात यांत्रिक बोटींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. महसूल व वन विभाग यांच्याकडून कारवाई होतच नसल्याने हे वाळूतस्करांना माहीत असल्याने फायबरच्या अवाढव्य बोटी भीमा नदीपात्रातून उपसलेल्या वाळूची वाहतूक करीत आहेत.रस्त्यासाठी येथील माफियांनी वनक्षेत्रातील मोठी झाडे भस्मसात करून त्यावर रस्ते तयार केले आहेत. विशेष म्हणजे, रस्त्याच्या मजबुती करणासाठी वनक्षेत्रातील मुरूमच वापरत आहेत. झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे; मात्र याकडे महसूल व वनविभाग डोळेझाक करत आहे. इतके होऊनही काहीच कारवाई होत नसल्याचा फायदा घेत या माफियांमध्ये वाळूउपशाची स्पर्धाच लागली आहे.वन विभागाचे अधिकारी एम. एन. हजारे म्हणाले की, वाळू वाहतूक ही वन विभागाच्या क्षेत्रातून होत नसून खासगी जागेतून होत आहे. रस्त्यापुरतीच आमची जागा असून रस्ता खोदला, तरी वाळूतस्कर पुन्हा दुरुस्ती करून वाळूचोरी करीत आहेत.शासन वनविकासाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करत आहे; परंतू वाळूतस्कर या शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहे. भीमेत बेसुमार वाळूउपसा होत असल्याने मासेमारी मोठी संकटात आलेली पाहायला मिळत आहे.वाळूउपसा करण्यासाठी नदीपात्रात यांत्रिक बोटीच्या आवाजाने येथील पशुपक्षी स्थलांतरित झालेले पाहायला मिळत आहे.वाळूमाफिया चक्क भीमा लगतच्या वनक्षेत्रावरच अतिक्रमण करताना दिसत आहेत.

टॅग्स :sandवाळूPuneपुणेtheftचोरी