शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नशेच्या थ्रिलसाठी चक्क जिभेवर घेतला जातोय स्नेक बाइट; २ ते ३ दिवसांपर्यंत झिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 12:22 IST

ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, असे तरुण या नशेकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत....

पुणे : साप किंवा नाग म्हटलं की आपण घाबरतो, पण या सापाकडून चावून घेण्याची नशादेखील केली जात आहे. त्यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, असे तरुण या नशेकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत.

पुणे शहरातच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारची नशा केली जात आहे. पूर्वीच्या काळी जंगलांमध्ये आदिवासी लोक अशी नशा थोडीफार करत असल्याचे उल्लेख आहेत. आज काही तरी थ्रिल करायचे म्हणून स्नेक बाइट करून त्याची नशा अंगी भिनवली जात आहे. ही नशा एक-दोन दिवस राहत असल्याचे सांगितले जाते. नशेसाठी निमविषारी सापांचा वापर केला जातो. त्यामध्ये मांजऱ्या, हरणटोळचा समावेश आहे. बिनविषारी साप कवड्या, दिवडचे पिल्लू आदी सापही वापरले जातात.

बिनविषारी साप कवड्या, दिवडचं पिल्लू या सापांना अमली पदार्थ असलेल्या बरणीत ठेवले जाते. त्या सापाला अमली पदार्थ चिकटलेला असतो. काही अंश तोंडालाही लागलेला असतो. नंतर नशा करणाऱ्या व्यक्तीला त्याचा बाइट दिला जातो. जे साप या वाईट कामासाठी वापरले जातात ते कालांतराने लवकर मरण पावतात.

- आनंद अडसूळ, अध्यक्ष, ॲनिमल स्नेक प्रोटेक्शन सोसायटी, पुणे

श्रीमंतांच्या मुलांकडे पैसा असतो. त्यांना ड्रग्जशिवाय वेगळी नशा करण्याची पॅशन असते. एका स्नेक बाइटला पाच हजारांपेक्षा अधिक पैसे घेतले जातात. हा स्नेक बाइट नेमका कुठे मिळेल, याविषयी खूप गुप्तता पाळली जाते. जी मुले पैसे खर्च करू शकतात, त्यांनाच हेरले जाते. तो प्रकार मी पाहिलेला आहे.

- शुभम, प्रत्यक्षदर्शी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड