शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुनांचा छळ करणाऱ्या कुटुंबीयांवर बहिष्कार..”, मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय
2
'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर ३० मिनिटांनी पाकिस्तानला माहिती दिली; एस जयशंकर यांनी खासदारांच्या पॅनेलला सांगितलं
3
वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही: मनोज जरांगे पाटील; कस्पटे कुटुंबियांचे केले सांत्वन
4
'लपून नाही तर सांगून पाकिस्तानवर हल्ला केला', गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींची गर्जना
5
MI vs PBKS : अर्शदीप सिंगची सुपर ओव्हर! परफेक्ट यॉर्करवर त्यानं सूर्यकुमार यादवलाही फसवलं
6
राज्यातील पहिल्या ‘एनएफएसयू’चे गृहमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; ट्रान्झिट कॅम्पसचेसुद्धा ई-अनावरण
7
टी-२० क्रिकेटमध्ये सूर्या दादाची 'दादागिरी'! टेम्बा बवुमाला मागे टाकत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
8
साताऱ्यातील बाहुबलीचा व्हिडीओ व्हायरल, शेतातील चिखलातून दुचाकी खांद्यावर घेऊन बाहेर काढली
9
"रोहितची बॅटिंग बघून असं वाटतंय की, तो गंभीर अन् गिलला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय"
10
COVID-19: भारतात कोरोना वाढतोय, बाधितांची संख्या १००० पार, महाराष्ट्रात २०९ रुग्णांची नोंद!
11
Government Yojana: आता रेशन कार्डधारकांना दरमहा १००० रुपये मिळणार, 'असा' करा अर्ज!
12
अस्वस्थ प्रवासी, ट्रॅक मॅनची प्रामाणिकता अन् आरपीएफची तत्परता
13
बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा, POCSO कायद्याचा खटला बंद; न्यायालयाने दिली क्लोजर रिपोर्टला मंजूरी
14
लातूरजवळ भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू
15
ज्योती मल्होत्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; आणखी चौकशी होणार, ज्योतीला पाकिस्तानात AK-47 घेऊन होती सुरक्षा
16
IND vs ENG : धोनी-कोहलीलाही नाही जमलं! इंग्लंड दोऱ्यात टेस्टमध्ये फक्त हे ३ भारतीय कॅप्टन ठरले बेस्ट
17
बारामतीत मुसळधार! ‘'काळजी करु नका, तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या बरोबर', अजितदादांचा नागरिकांशी संवाद
18
फ्रान्सच्या राष्ट्रपतींना पत्नीनं सर्वांसमोर मारली थापड? तोंड लपवू लागले इमॅन्युएल मॅक्रॉन, बघा VIDEO
19
Retirement: मोठी बातमी! इंग्लंड दौऱ्यापूर्वी आणखी एका भारतीय खेळाडूनं घेतली निवृत्ती
20
सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने 'या' मुस्लिम देशात केली पाकिस्तानची पोलखोल

विविध पक्षांची अनाकलनीय युती

By admin | Updated: August 7, 2015 00:45 IST

पुरंदरमधील ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी कोठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली. गावपातळीवर गावकी-भावकी, वेगवेगळ्या

सासवड : पुरंदरमधील ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी कोठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली. गावपातळीवर गावकी-भावकी, वेगवेगळ्या पक्षांची अनाकलनीय युती यांमुळे या निवडणुकीत कोणत्या पक्षाने ग्रामपंचायत ताब्यात घेतली, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तालुक्यातील काही मोजक्या गावांतील पुढाऱ्यांनी आपापली ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. बऱ्याच गावांतून सदस्यसंख्या जास्त असूनही सरपंचपदाच्या आरक्षणामुळे ग्रामपंचायतीवर वेगळ्याच पक्षाचा झेंडा फडकणार असल्याचे अधोरेखित झाले आहे. नायगाव येथे काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या ५, तर शिवसेनेच्या पदरात ४ जागा पडल्या आहेत. कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजयराव कोलते यांनी त्यांच्या गावची ग्रामपंचायत काँग्रेसच्या मदतीने ८ जागा जिंकून कायम ठेवली असली, तरी विरोधकांच्या ३ जागांवर मात्र त्यांना पाणी सोडावे लागले. नायगाव आणि पिसर्वे येथे आरक्षणामुळे सरपंचपद मात्र विरोधकांच्या पारड्यात पडले आहे. पश्चिम भागातील जिल्हा परिषद सदस्य व कात्रज दूध संघाचे सदस्य गराडेचे गंगाराम जगदाळे यांनी मनसेच्या माध्यमातून ७ जागा जिंकून जरी आघाडी घेतली असली, तरी विरोधकांनी ४ जागा जिंकण्याची किमया केली आहे. गेल्या निवडणुकीत गंगाराम जगदाळे यांनी ११ विरुद्ध १ अशी बाजी मारली होती. नीरा या मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत १७ जागांपैकी काकडे गटाने ११ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले असले, तरी सरपंचपदाच्या उमेदवारासह ६ जागा जिंकून चव्हाण गटाने वरकडी केली आहे. हरगुडे ग्रामपंचायतीत भूषण ताकवले यांनी शिवसेनेच्या माध्यमातून ४ जागा जिंकून विरोधकांना केवळ ३ जागा दिल्या आहेत. दिवे या मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेच्या विरोधात अन्य सर्व पक्षीय आघाडी अशा रंगलेल्या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांना ७-७ जागा आणि प्रत्येक गटाच्या एका उमेदवाराला समसमान मते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीद्वारे उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पडली. भिवडीत ११ जागांपैकी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीला ६, तर शिवसेनेसह अन्य पक्षांच्या आघाडीला ५ जागा मिळाल्या असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सतीश गायकवाड आणि विरोधी गटाचे संदीप पवार या दोघांनाही समान मते पडली असता, पोस्टल मतदानाच्या आघाडीवर सतीश गायकवाड यांचा विजय निश्चित करण्यात आला.दरम्यान, आज सकाळी ९ वाजता दिवे येथील आयटीआय केंद्रात मतमोजणीला प्रारंभ झाला. १८ टेबलांवर यापूर्वी निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार ३ ते ४ गावांची एका वेळी मतमोजणी करण्यात आली. त्याअनुषंगाने त्या गावचे उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात आल्यामुळे कोठेही गोंधळाची स्थिती निर्माण झाली नाही. निवडणूक निकालानंतर मतमोजणी केंद्राबाहेरील रस्त्यावर मात्र कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत पक्षांचे झेंडे मिरवत मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा केला. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील, सहायक अधिकारी सुनंदा भोसले-पाटील, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, सासवडचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी, पोलीस व होमगार्ड या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून निवडणूक मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली.खळद, परिंचे आणि यादववाडी-सटलवाडी, मांडकी, तोंडल, पिसुरटी, हरगुडे, पिसे, राख, नावळी या गावांतून शिवसेनेने बाजी मारल्याचे समजते; तर पिसर्वे, गुऱ्होळी, दिवे, हरणी, काळदरी, नाझरे क.प., नाझरे सुपे, साकुर्डे, पिंगोरी, पांडेश्वर आदी ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या विचाराच्या झाल्याचे समजते. हिवरे, टेकवडी, मावडी क.प., माहूर, देवडी, कोळविहिरे, कोडीत, नारायणपूर, नीरा, शिवरी, पिंपरे खुर्द, लपतळवाडी, धालेवाडी, पानवडी आदी ग्रामपंचायतींत काँग्रेसची सरशी झाल्याचे समजते. दरेवाडी तालुका पुरंदर येथील निखिल वाडकर या लहान मुलाने रामदास गायकवाड यांच्या नावाची चिठ्ठी काढली. तसेच, बोपगाव येथील निवडणुकीतही राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीला ४, तर शिवसेना-मनसे आघाडीला ४ जागा मिळाल्याने येथेही चिठ्ठीद्वारे वनिता जगदाळे या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यात आला; परंतु दोन्ही गटांनी मतमोजणी केंद्रावरच एकत्रित येऊन सरपंचपदाची धुरा दोघांनीही अडीच-अडीच वर्षे सांभाळण्याचा निर्णय घेतला. योगेश फडतरे, दीपक फडतरे, दयानंद फडतरे, संदीप फडतरे आदींनी याबाबत विशेष पुढाकार घेतला.