शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माझा संसार उघड्यावर पडला, तुम्ही विचार करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 01:07 IST

‘चांगली दृष्ट लागावी असा आमचा संसार चाललेला; परंतु मराठा असल्याने नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शेतीवर ५ जणांचे कुटुंब अवलंबून आहे.

नीरा : ‘चांगली दृष्ट लागावी असा आमचा संसार चाललेला; परंतु मराठा असल्याने नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शेतीवर ५ जणांचे कुटुंब अवलंबून आहे. मात्र, दुष्काळी पट्टा, पिकाचा भरवसा नाही; त्यामुळे शेती तोट्यात जायची. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी माझ्या पतीने आत्महत्या केली; पण आज माझा संसार उघड्यावर पडला. माझी पोरंबाळं आता बाप पाहू शकणार नाहीत. घराचा कर्ता गेला तोही माझ्या येणाºया बाळाचं तोंड न पाहता! बाबांनो, माझा संसार उघड्यावर पडला, आता तुमी तरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका!’ अशा शब्दांत डोळ्यांत पाणी आणून दत्तात्रय शिंदे यांच्या पत्नी अश्विनी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.आरक्षणासाठी आत्महत्या केलेले दत्तात्रय शिंदे यांच्या पत्नी अश्विनी यांच्याशी आज ‘लोकमत’ने संपर्क साधला. त्यांनी समाजातील इतर तरुणांना भावपूर्ण आवाहन केले. काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येनंतर मराठा आंदोलन चिघळले. याचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटले.जिल्ह्यातील काही तालुक्यांत आंदोलनाला हिंसक वळण लागले. मात्र, पुरंदर तालुक्यात रास्ता रोको, मोर्चा, श्रद्धांजली सभा घेऊन शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यात आले. याच तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे येथील परिसरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आत्महत्या हा मागण्या मान्य करण्याचा अंतिम पर्याय नसून तरुणांनी आत्महत्येकडे वळू नये,अशी विनवणीच अश्विनी शिंदे यांनी केली.शिंदे म्हणाल्या, ‘‘असले कसले सरकार आहे? ज्याला माणसाची किंमत नाही. माझ्या नवºयाचा जीव घेऊन मला पोरके केले. किमान यापुढे तरी मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये, हे तरुणांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.’’>कुटुंबाला मदतीची गरज...घरातील कर्तापुरुष अचानक गेल्याने घरावर शोककळा पसरली आहे. दत्तात्रय यांचे बंधू अद्याप लहान आहेत; मात्र घरातील किमान एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी तसेच आर्थिक तरतूद मिळावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनीही कुटुंबाला शक्य तितकी मदत करावी. तसेच, शिंदे यांना गावात घर नसल्याने ते त्यांच्या काकांच्या घरात राहत आहेत. त्यांच्या परिवाराला किमान राहण्यासाठी पक्के घर बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :WomenमहिलाMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा