शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

माझे माहेर पंढरी..., गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध; काश्मीरच्या शमिमा अख्तरने आळवला पांडुरंगाचा राग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 15:28 IST

निमित्त हाेते, ‘काश्मीर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’चे

पुणे : वारकऱ्यांसह पुणेकरांनाही वारीचे वेध लागलेले असतानाच शमिमा अख्तर या काश्मिरी मुस्लीम तरुणीने ‘माझे माहेर पंढरी’ हे गाणे सादर करून पुणेकरांना मंत्रमुग्ध करून टाकले. निमित्त हाेते, ‘काश्मीर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’चे. यात शमिमाने आळवलेला पांडुरंगाचा राग उपस्थितांच्या काळजात भिडला. तिच्या गोड आणि मनाला प्रसन्नता देणाऱ्या स्वरांनी वारीपूर्वीच चंद्रभागेच्या तीरी भक्तिमेळा रंगल्याची प्रचिती उपस्थितांना दिली.आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ हाेण्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी साेहळा सज्ज झाला आहे. तसेच राज्यभरातील भाविक पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. पुणेकरांनाही पालखी साेहळा आगमनाचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शमिमा अख्तर हिच्या गाण्याने वातावरण भक्तिमय झाले.

दहशतवाद, अस्वस्थता अन् अशांततेला सामोरे जात असतानाच देशात धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी शमिमा ही तरुणी समाजाला ‘तिमिरातुनी तेजाकडे’ नेण्यासाठी पसायदानाबरोबरच संत रचनांमधून वैश्विक शांततेचा संदेश देऊ पाहत आहे, हे यातील वेगळेपण! विशेष म्हणजे, काश्मीरच्या नंदनवनात शमिमाचं बालपण फुललं असलं तरी तिचं माहेर आता पुणे झाले आहे.

काश्मीरच्या बांदिपुरा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातली ही मुलगी. आई, वडील आणि पाच बहिणी हे तिचं कुटुंब. काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणारे सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी तिला पुण्यात आणले. तिच्या मधुर आवाजातून सर्वप्रथम सूर गुंजले ते ‘पसायदाना’चे! जगातील शांततेसाठी, प्रत्येक माणसाच्या सुखासाठी विश्वात्मकाकडे तिने पसाय‘दान’ मागितले. तिच्या त्या जादुई स्वरांनी सर्वच जण भारावून गेले नसते तरच नवल! शमीमा म्हणते, संगीताची कोणतीच भाषा नसते. मी ‘पसायदान’ म्हणते किंवा काश्मीरमध्ये दुवा मागते तेव्हा फक्त भाषेचा फरक आहे, असे वाटते. माझे आजोबा (दादाजी) काश्मीरमधले मोठे संत कवी होते. मावशी दूरदर्शनमध्ये गायिका होती. त्यामुळे गाणं सातत्याने कानावर पडत राहायचं. पण कधी दुसऱ्या शहरात येऊन गाईन असे वाटले नाही. मात्र, सरहद आर्ट फेस्टिव्हलनिमित्त मी २०१७ मध्ये पहिल्यांदा पुण्यात आले. आता कायमस्वरूपी इथंच राहणार आहे. नुकतंच माझं लग्न झालं आहे. इथंच आमचं घर आणि स्टुडिओ आहे. काश्मीरनंतर पुणे माझं दुसरं माहेर झालं आहे.

 ‘काश्मीर फाइल्स’ पाहिलाच नाही

मी काश्मीरमध्ये पंडितांच्या भागात राहत होते. आम्ही सर्व जण नेहमीप्रमाणे राहिलो. आई मला बाहेर दुसऱ्या ठिकाणी पाठवायला घाबरत होती. माझ्या वडिलांचे मित्र काश्मिरी पंडित होते, त्यांचे नाव रतनलाल आणि फुलनदेवी. त्यांना आम्ही ‘डॅडी’ आणि ‘ममा’ म्हणायचो. त्यांनी माझ्या आई-वडिलांना समजावले. आमच्या गल्लीला ओलांडून असलेले मंदिर मुस्लीम कुटुंबांनीच बांधले आहे. आजही तिथे काश्मिरी पंडित परत येतात, तेव्हा मुस्लीम कुटुंबांच्या घरी आवर्जून जातात. एकमेकांच्या गळ्यात पडून रडतातही. काश्मिरी मुस्लिमांनी हे सगळं केलं असतं तर ते मुस्लीम कुटुंबांना भेटायला गेले असते का? त्यामुळे ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांमध्ये चुकीचे चित्रीकरण दाखवून दोन धर्मांमध्ये द्वेष पसरविला जात आहे. म्हणून मी हा चित्रपट पाहिलाच नाही. एकमेकांच्या धर्माचा सन्मान करा आणि माणसांचा आदर करायला हवा, असेही शमीमा अख्तर सांगते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरartकलाSocialसामाजिक