शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Mutha Canal : जमीन खचली अन् संसाराचा झाला चिखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 03:52 IST

‘‘सर्वत्र गुडघाभर झालेला चिखल, प्रत्येक घरातील जमीन खचलेली, अस्ताव्यस्त पडलेले कपडे, भांडी, डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या अन् मनात पसरलेले नैराश्य, खिन्न चेहरा आणि पोटात भुकेचा उसळलेला आगीचा डोंब... अशी मन हेलावून टाकणारी विदारक स्थिती दांडेकर पुलालगतच्या झोपडपट्टीत पाहिली,’’ अशा भावना तेथे मदतीला गेलेल्या स्वंयसेवकाने ‘लोकमत’ला सांगितल्या.

- अमोल अवचितेपुणे - ‘‘सर्वत्र गुडघाभर झालेला चिखल, प्रत्येक घरातील जमीन खचलेली, अस्ताव्यस्त पडलेले कपडे, भांडी, डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या अन् मनात पसरलेले नैराश्य, खिन्न चेहरा आणि पोटात भुकेचा उसळलेला आगीचा डोंब... अशी मन हेलावून टाकणारी विदारक स्थिती दांडेकर पुलालगतच्या झोपडपट्टीत पाहिली,’’ अशा भावना तेथे मदतीला गेलेल्या स्वंयसेवकाने ‘लोकमत’ला सांगितल्या. अनेक संसार उद्ध्वस्त झालेत आणि आता त्यांना पोटासाठी अन्न आणि अंग झाकायला कपडे पाहिजेत. त्यासाठी अनेकांना आवाहन करतोय, असेही हा स्वंयसेवक म्हणाला.सिंहगड रस्त्यावरील मुठा उजवा कालव्याची भिंत पडल्याने अनेकांचा संसार पाण्यासोबत वाहून गेला. घडलेल्या घटनेमुळे वसाहतीत घबराटीचे वातावरण होते. रात्रीची राहण्याची व्यवस्था मनपाच्या शाळेत केली होती. अनेक सामाजिक संस्था, गणेश मंडळे, नगरसेवक यांच्याकडून जेवणाची व्यवस्था केली होती. कोणाच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत, तर कोणाचे सगळे घरच पाण्यासोबत वाहून गेले. एका क्षणात सगळा संसार पाण्यात वाहून गेल्याने उद्याच्या काळजीने अनेकांना रात्री झोपच आली नाही. सकाळी उठताच चहापाणी न घेता बेघर झालेल्या नागरिकांनी घराकडे धाव घेतली. दुपारच्या वेळचे जेवणाचे ताट हातात होते, समोर वाहून गेलेला संसारहोता हे सर्व पाहून कोणाच्याही घशाखाली घास उतरत नव्हता. पडलेल्या घरातून कपडे, महत्त्वाची कागदपत्रे, आवडत्या वस्तू शोधण्यात नागरिक गर्क होते.समोर वाहते पाणी अन् डोळ्यांतही पाणीच...४काही नागरिक पडलेल्या घराच्या फरशीवर बसून आंबिल ओढ्यामधून वाहणाऱ्या पाण्याकडे हताशपणे बघत होते. जसे पाणी वाहत होते, तसतसे त्यांच्याही डोळ्यांतून पाणी वाहत होते. त्यातच कोणाला स्वत:च्या घरातील भांडी सापडत होती म्हणून आनंदी होत होते, तर कोणी आता काहीच सापडत नव्हते म्हणून दु:खी होते. ज्येष्ठ नागरिक डोक्याला हात लावून कावरेबावरे होऊन डोळ्यातले पाणी पुसत होते. मुलाबाळांच्या वाहून गेलेल्या संसारामुळे त्यांच्या जिवाची घालमेल होत होती.संसार उभारणार...1आता काय करायचं हो मॅडम आम्ही ? सगळंच वाहून गेलंय आमचं. जे मिळेल ते गोळा करतोय आणि संसार उभा करतोय... या आर्त भावना दांडेकर पुलालगतच्या झोपडपट्टीतील महिलांच्या आहेत. कॅनॉल फुटल्याने पुलालगतच्या झोपडपट्टीत पाणी शिरल्याने अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आजची सकाळ उजाडली आणि सर्वत्र भकास वातावरण दिसून आले.2येथील कुटुंबीयांना आधार देण्यासाठी के अ‍ॅँड क्यू परिवाराचे सदस्य घटनास्थळी पोहोचले. त्यांनी येथील नागरिकांच्या चहानाष्ट्याची सोय केली. तेव्हा अनेकांनी आपल्या मनात दाटलेल्या भावना व्यक्त केल्या. येथील महिलांना मानसिक बळ देण्याचे काम या के अ‍ॅँड क्यूच्या सदस्यांनी केले व त्यांच्याशी संवाद साधला.कुठल्या दुरुस्तीची गरजसर्वच कालव्याच्या भिंती खचल्याने त्या पोकळ झाल्या आहेत.भिंतीतील माती बाहेर पडून तिचे ढीगसाचले आहेत.भिंतींमध्ये झाडांची मुळे शिरल्याने त्यांना तडे गेले आहेत.पुलाच्या खांबांमधील दगड उघडे पडले आहेत.अनेक ठिकाणी संरक्षक कठडेच नाहीत.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या