शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंदांवर संगीतमय चरित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 03:05 IST

‘विवेकानंद ज्ञानपीठा’ची उभारणी होणार

पुणे : ‘माझ्या बंधू-भगिनींनो...’ या स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्म परिषदेत दिलेल्या व्याख्यानाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून रामकृष्ण मठाच्या पुणे केंद्रातर्फे ‘युगनायक विवेकानंद’ हा संगीतमय चरित्रपट तयार करण्यात आला आहे. पुण्यात ‘विवेकानंद ज्ञानपीठा’ची निर्मिती करण्यात येत आहे. त्याच्या उभारणीसाठी चरित्रपटाच्या शुभारंभाचे दोन प्रयोग पुण्यात होणार आहेत.रामकृष्ण मठाच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंदजी यांनी ही माहिती दिली. या चरित्रपटाचे संगीत दिग्दर्शक केदार पंडित, प्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर, नृत्यदिग्दर्शिका अमीरा पाटणकर, मधुरा आफळे आणि कार्यकारी दिग्दर्शक नचिकेत जोग या वेळी उपस्थित होते. या चरित्रपटाचे कथालेखक आणि गीतकार स्वामी श्रीकांतानंदजी हे आहेत. पुण्यातील प्रयोगांनंतर या चरित्रपटाचे प्रयोग राज्यातील प्रमुख शहरांत सादर केले जाणार आहेत.स्वामी श्रीकांतानंदजी म्हणाले, ‘‘रामकृष्ण मठाच्या परिसरात ‘विवेकानंद ज्ञानपीठा’ची उभारणी करण्यास प्रारंभ झाला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च येणार आहे. येत्या चार वर्षांत हे ज्ञानपीठ उभे राहील. त्यात भाषा, संस्कृती आणि मूल्यशिक्षण याविषयीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संस्कृती आणि मूल्य शिक्षण देणारे ‘विवेकानंद स्कूल आॅफ कल्चर’, विविध परकीय भाषांचे ज्ञान देणारी ‘निवेदिता स्कूल आॅफ लँग्वेजेस्’, एम.ए. अभ्यासक्रम व आॅनलाईन अभ्यासक्रमाची सुविधा असलेले ‘वेद संस्कृती विद्यालय’ यांचा समावेश आहे. चरित्रपटाच्या प्रयोगातून मिळणारा निधी मठातील विविध कार्यांसाठी खर्च केला जाईल.’’पोवाडा, भजन, शास्त्रीय संगीताचा समावेशजाणता राजा’च्या धर्तीवर ‘युवानायक विवेकानंद’ या चरित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पोवाडा, अभंग, भजन, कव्वाली, शास्त्रीय संगीत अशी विविध स्वरूपांची १७ गीते आहेत. पं. संजीव अभ्यंकर, अवधूत गुप्ते यांच्यासह नवोदित गायकांच्या स्वरांत ही गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांच्यावरील महानाट्याचे स्वप्न साकार झाले आहे.- केदार पंडितया चरित्रपटाचे महानायक स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिरेखेसाठी माझा आवाज वापरला गेला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या मनात उमटलेली, स्वामी श्रीकांतानंदजी यांनी गीताच्या रूपात मांडलेली आणि केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेली भावना माझ्या आवाजातून व्यक्त होते. - संजीव अभ्यंकर

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदcinemaसिनेमा