शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कामातच असते संगीत

By admin | Updated: November 2, 2014 00:10 IST

व्यक्ती कोणतेही काम करत असू दे, प्रत्येक कामात एक प्रकारचे संगीत, ताल, लय असते, असे मत ज्येष्ठ छायाचित्रकार रघुराय यांनी व्यक्त केले.

पुणो : व्यक्ती कोणतेही काम करत असू दे, प्रत्येक कामात एक प्रकारचे संगीत, ताल, लय असते, असे मत ज्येष्ठ छायाचित्रकार रघुराय यांनी व्यक्त केले. कुमार गंधर्व यांच्यावरील ‘कालजयी कुमार गंधर्व’ या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. 
कुमार गंधर्व प्रतिष्ठान, सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्र आणि आशय फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित कुमार गंधर्व यांच्या 9क्व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. या प्रसंगी व्यासपीठावर राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, पुस्तकाचे संपादन केलेल्या रेखा इनामदार-साने, प्रसिद्ध गायिका आणि कुमारजींची कन्या कलापिनी कोमकली, ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी, कुमारजींची पत्नी वसुंधराताई कोमकली आणि ललित कला केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर उपस्थित होत्या. 
कुमारजी हे केवळ गायक नसून, आपल्या कलेतून श्रोत्यांना ईश्वराशी  भेट घालून देतील, असे ते उत्तम कलाकार होते. त्यांची तुलना ही सिगल पक्ष्याशी केल्यास वावगे ठरणार नाही. हा पक्षी ज्याप्रमाणो रोज नव्या दमाने उड्डाण घेतो त्याप्रमाणो कुमारजी प्रत्येक वेळी नव्याने आपली कला सादर करायचे. त्यामुळे त्यांनी कलेतील पवित्रता जपली होती, असे रघुराय कुमारजींच्या आठवणी सांगताना म्हणाले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कलापिनी कोमकली आणि कुमारजींचे नातू भुवनेश कोमकली यांनी आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. 
माजगावकर यांनी पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली तर रेखा इनामदार-साने यांनी  सूत्रसंचालन केले.  (प्रतिनिधी)
 
4कुमारजींच्या गायनात ब्रह्मांड दर्शनाची जादू होती. कोणतीही कला सादर करताना, जो कलाकार त्यामध्ये स्वत:चे भाव उतरवतो, तो खरा महान कलाकार, त्यामुळेच गायनाच्या बाबतीत कुमारजी हे महान होते. कोणत्याही रागाला स्वत:चा अर्थ नसून कलाकार तो देत असतो, हे कुमारजींनी आपल्या कलेतून सिद्ध केले. त्यांची कला ही कालातित आहे, असे अशोक वाजपेयी म्हणाले. 
465क् पानांच्या या पुस्तकात एकूण विविध क्षेत्रंतील 65 लेखकांनी  मनोगते व्यक्त केली आहेत. यामध्ये कुमार गंधर्व यांचे कुटुंबीय, अनेक प्रसिद्ध गायक, वादक, त्यांचे शिष्य, नामवंत लेखक, संगीत समीक्षक व इतर अनेक क्षेत्रंतील मान्यवरांनी लेखन केलेले आहे. याबरोबरच कुमारजींच्या जीवनातील काही क्षण छायाचित्रंच्या माध्यमातूनही यामध्ये दाखविण्यात आले आहेत.