शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भावना व शब्द यांच्या आधाराने संगीत पूर्ण : सुरेश तळवलकर : प्रभाकर जोग यांना ‘गदिमा पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 12:02 IST

भावना व शब्द यांच्या आधाराने संगीत पूर्ण होते, असे मत तालयोगी सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले. यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग यांना प्रदान करण्यात आला, या वेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देमाझ्या कारकिर्दीची सुरुवात गदिमांच्या गाण्याने : प्रभाकर जोगगदिमांचे साहित्य सर्व क्षेत्र व्यापून टाकते : धनश्री लेले

पुणे : शरीर, बुद्धी, मन यातून उत्कृष्ट संगीत निर्माण होते. लय आणि स्वरांनी तो शब्द मनात स्थिर होतो. गदिमांचे गीतरामायण आणि सुधीर फडके यांच्या संगीताच्या साक्षीदाराला हा पुरस्कार मिळतो आहे याचा विशेष आनंद आहे. भावना व शब्द यांच्या आधाराने संगीत पूर्ण होते, असे मत तालयोगी सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले.गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ग. दि. माडगूळकर यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग यांना, गृहिणी सखी सचिव पुरस्कार पुष्पाताई भट, चैत्रबन पुरस्कार निवेदिका धनश्री लेले, विद्या प्रज्ञा पुरस्कार गायिका सावनी रवींद्र, गदिमा पारितोषिक आरोही खोडकुंभे यांना प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी आनंद माडगूळकर, श्रीधर माडगूळकर उपस्थित होते. तळवलकर म्हणाले, ‘‘गुरूकडून शिकायचे असते, पण शिकल्यानंतर ते मनातून उतरावयाचे असते. जोग यांचे व्हायोलिनवादन ऐकताना गाणे ऐकल्याचा भास होत होतो. त्यांच्या वाद्यातून शब्द ऐकायला येत होते. साधनेतून काही लोकांचे चेहरे वाचता येतात. त्यामधे गदिमा एक होते. जोग म्हणाले, की एका महाकवीच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या कारकिर्दीची सुरुवात गदिमांच्या गाण्याने केली होती. त्या वेळी ते म्हणाले होते, की मी टाकून दिलेल्या गाण्याचे तू सोने केले. तेव्हापासून मी ठरवले की सोन्यासारखे काम करून मोठे व्हायचे. लेले म्हणाल्या, गदिमा ही तीन अक्षरे खूप वजनदार आहेत. गदिमा म्हणजे भव्यतेचा हिमालय होते. गदिमांचे साहित्य सर्व क्षेत्र व्यापून टाकते. अभिजित कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. राम कोंजटकर यांनी आभार मानले.

गदिमांच्या स्मारकाचा मुद्दा अनेकदा उपस्थित होऊनही त्यांचे स्मारक होऊ शकले नाही. मोहन धारिया, ना. धों. महानोर यांनीही स्मारकाची वेळोवेळी मागणी केली आहे. पुण्यात गदिमांचे स्मारक होणे हे पुण्याला पुण्यभूषण आहे. यासाठी राज्य सरकार व पुणे महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.                     - श्रीधर माडगूळकर 

टॅग्स :Puneपुणे