शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

सावकारी वादातूनच इंदापूर तालुक्यातील ‘त्या’ तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:24 IST

प्राथमिक तपासात उघड : दोघांना अटक, मित्रानेच केला घात

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील गोतोंडी येथील अनंता सोपान माने या तरुणाच्या खूनप्रकरणी बुधवारी पोलिसांनी दोघांना अटक केली. सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे परत न केल्यामुळेच अनंताचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. अनंताचा मित्र शिवराज हेगडे यानेच रविवारी रात्री दारूच्या नशेत अनंताच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : अनंता माने याने २ वर्षांपूर्वी त्याचा निमगाव केतकी येथील मित्र शिवराज हेगडे याच्या मध्यस्थीने तरंगवाडी (ता. इंदापूर) येथे राहणारा सावकार सोमनाथ जळक, तसेच अकलूज येथील दीपाली पवार यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याने वेळोवेळी त्यांचे पैसे पूर्ण फेडले होते. मात्र, तरीही त्याचा पैशासाठी हे तिघे छळ करीत होते. त्याच्या छळाला कंटाळून तो पुण्याला निघून आला होता. तरीही आरोपींनी त्याचा छळ सुरू ठेवला होता. रविवारी (दि. ३०) सावकाराने अनंता माने याला भेटायला बोलावले होते.शिवराज हेगडे आणि अनंता दोघेही सोबत दारू प्यायले. यावेळी पैसे देत नसल्याने हेगडे याने अनंताच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले. दुसऱ्या दिवशी (दि. १) शिवराज हेगडे याने अनंताचे वडील सोपान माने यांना घेऊन अनंताच्या अपहरणाची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दिली. शिवराज अनंताच्या सोबत असल्याने सोमनाथ यांना शंका आल्याने मंगळवारी सोमनाथ माने यांनी सोमनाथ जळक आणि शिवराज हेगडे याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मंगळवारी रात्री अनंताचा मित्र शिवराज हेगडे याला अटक केली. तसेच बुधवारी दीपाली पवार यांना अटक केली. त्यानंतर ही माहिती उघड झाली. शिवराज हेगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार : अनंता माने व शिवराज यांनी निमगाव केतकी येथे (दि. ३०) सकाळी १२ वाजता मद्यपान केले. यानंतर ते दोघे आबा हेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ जाऊन झोपले. अनंता माने झोपेत असताना शिवराजने त्याच्या डोक्यात दगड टाकल्याने त्याचा मृत्यू झाला.सावकार सोमनाथ जळक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दीपाली मधुकर पवार यांना इंदापूर न्यायालयालयापुढे हजर केले असता तिला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. शिवराज कांतिलाल हेगडे याला ९ तारखेपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक राम गोमारे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे