शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भाजीच्या पैशावरून झाला वाद : संतापाच्या भरात सख्ख्या मित्राचाच केला खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 18:56 IST

भाजी आणण्यासाठी कोणी पैसे द्यायचे या कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खुन करण्याची घटना उघड झाली आहे़. 

पुणे : भाजी आणण्यासाठी कोणी पैसे द्यायचे या कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खुन करण्याची घटना उघड झाली आहे़.  किरण काटकर (वय २८, रा़ येवलेवाडी ता़ हवेली) असे खुन झालेल्या कामगाराचे नाव आहे़. नऱ्हे येथील अभिनव कॉलेज मार्गावरील स्वराज डेव्हलपर्स बांधकाम साईटवरील पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना दरम्यान घडली़.  या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

 पप्पु पाटील (वय २८) असे आरोपीचे नाव आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, किरण काटकर आणि पप्पू पाटील हे दोघे एकमेकांचे मित्र होते़ ते बांधकाम साईटवरील पत्र्याच्या शेडमध्ये एकत्र रहात होते़.  सोमवारी त्यांच्या भाजी आणण्यासाठी पैसे कोण देणार यावरुन भांडणे झाली होती़. त्यानंतर काटकर याने आपला नातेवाईक आत्माराम जाधव यांना बोलावून घेतले़.  तेव्हा ही भांडणे मिटवण्यासाठी जाधव यांनी १०० रुपये दिले चिकन आणण्यास सांगितले. मात्र पप्पु पाटील हा चिकनऐवजी अंडी घेऊन आला़.  त्यावरुन पुन्हा भांडणाला सुरुवात झाली आणि रागाच्या भरात काटकर याने पप्पूला मारले़.  तेव्हा त्याने बघुन घेण्याची धमकी दिली़. त्यानंतर तिघेही न जेवता झोपी गेले़. 

                      जाधव हे सकाळी सहा वाजता उठून प्रातर्विधीसाठी बाहेर गेले असताना पप्पू पाटील याने झोपलेल्या काटकर याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन केला व तो पळून गेला़. या प्रकरणात पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, बाजीराव मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संगीता यादव, आदींनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप तपास करत आहेत. 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी