किरण रोहीदास साळुंखे (रा. आखरवाडी, ता. खेड), शंकर उर्फ आबा तुकाराम मोहिते (रा. चास, ता. खेड) सचिन तानाजी मोहिते (रा. करजंविहिरे, ता. खेड), जयेश नाईकरे (रा. बारापाटी कमान, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील मयत राहुल संभाजी मोहिते याने किरण रोहिदास साळुंखे यांचे वडिलांना काही दिवसांपूर्वी एसटी स्टॅन्ड येथे दारू पिऊन मारहाण केलेली होती. तसेच किरण याचे वडिलांना सतत त्रास देत होता. त्या कारणावरून तसेच पाच ते सहा दिवसांपूर्वी झालेल्या बाचाबाचीवरून शंकर उर्फ आबा तुकाराम मोहिते व सचिन तानाजी मोहिते यांचे राहुल संभाजी मोहिते यांचेबरोबर जागेचे कारणावरून असलेल्या भांडणामुळे आरोपींनी संगनमत करून धारदार हत्यारांनी डोक्यात, पाठीवर, तोंडावर, गळ्यावर हातावर वार करून त्याचा खून करून मृतदेह पाण्यात टाकून दिला असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे, असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.
जुन्या भांडण्याचा कारणावरून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST