शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मित्राचा खून झाला उघड, मृतदेहाचे तुकडे जाळून टाकले कालव्यात, गुन्हे विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 06:02 IST

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडून १० महिन्यांपूर्वी निर्घृणपणे केलेल्या मित्राच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मृतदेहाचे तुकडे अर्धवट जाळून वानवडी परिसरातील कालव्यात टाकून दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडून १० महिन्यांपूर्वी निर्घृणपणे केलेल्या मित्राच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मृतदेहाचे तुकडे अर्धवट जाळून वानवडी परिसरातील कालव्यात टाकून दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.विक्रम शेखर पिल्ले (वय २८, रा. फातिमानगर), राजू शिवाप्पा नारायण नाईक (वय ३४), संभू बाळकृष्ण थापा (वय २० दोघेही रा. बी.टी. कवडे रोड, घोरपडी), फारूक रफिक शेख (वय २६) आणि शाहरुख सिकंदर शेख (वय २५, दोघेही रा. भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिल्ले विरोधात पाच गुन्हे दाखल असून तो खंडणीच्या गुन्ह्यात फरार होता. न्यायालयाने त्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.बी. टी. कवडे रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी काही युवक कॅनॉल रोड येथे येणार असल्याची माहिती युनिट एकमधील पोलीस शिपाई गजानन सोनुने यांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि. २८) रात्री ११ च्या सुमारास पथकाने सापळा लावून पिल्लेसह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एअर गन, काडतुसे, चार कोयते, मास्क, दोरी व मोबाईल, असा १८ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींनी त्यांचा मित्र विकी रमेश पोताण (वय २५ रा. ढोबळवाडी, वानवडी) याचा खून केल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले, समीर शेख, नितीन भोसले पाटील, धनंजय कापरे, हर्षल कदम, प्रकाश लोखंडे, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले, राजाराम सुर्वे यांनी कारवाई केली़जॉकी.. ते गुन्हेगारआरोपी विक्रम पिल्ले हा हॉर्स रायडर (जॉकी) म्हणून पेसी शॉप आणि मल्लेश नरेडू या कंपनीमध्ये नोकरी करीत होता. त्याला दीड लाख रुपये वेतन होते. हॉर्स रायडिंगमध्ये सहभाग घेण्यासाठी त्याने इंग्लंड आणि मलेशिया या देशांमध्ये काही वर्षे वास्तव्य केले आहे. मात्र, वाईट वर्तनामुळे त्याला कंपनीतून काढूले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्याने वानवडी परिसरात चायनिज हॉटेल टाकले होते. केवळ सहावीपर्यंत शिक्षण घेतलेला पिल्ले सफाईदारपणे इंग्रजीत संभाषण करतो.मृतदेहाच्या तुकड्यांची कालव्यात विल्हेवाटआरोपी विक्रम पिल्ले याने चायनिज पदार्थांचे हॉटेल सुरू केले होते. विकी पोताण हा हॉटेलमध्ये येऊन त्यास दमदाटी करीत पैसे घेत होता. तसेच, फुकटात जेवण करीत असे. विकीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पिल्ले आणि इतर चौघांनी त्याचा काटा काढण्याचा कट रचला.जानेवारी महिन्यात त्याला हॉटेलमध्ये जेवायला बोलावले. त्यानंतर त्याला दारू पाजली. नशेत असताना त्याच्यावर शस्त्राने वार करून खून केला. तसेच, मृतदेहाचे तुकडे करून ते अर्धवट जाळले आणि वानवडी परिसरातील कालव्यात फेकून दिले.

टॅग्स :Crimeगुन्हा