शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

फिल्मी स्टाईलने झालेल्या खुनातील फरार आरोपीला १० महिन्यांनी हवेलीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 6:37 PM

नांदोशी गावाजवळ गेल्या वर्षी फिल्मी स्टाईलने झालेल्या खुनातील फरार आरोपीला तब्बल दहा महिन्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले. अक्षय आनंदा चौधरी (रा. नांदोशी हवेली) असे आरोपीचे नाव आहे. 

ठळक मुद्देबाळासाहेब शंकर घुले यांचा २७ एप्रिल २०१७ रोजी झाला होता खूनयातील ८ आरोपींना या पूर्वी करण्यात आली आहे अटक

पुणे : नांदोशी गावाजवळ गेल्या वर्षी फिल्मी स्टाईलने झालेल्या खुनातील फरार आरोपीला तब्बल दहा महिन्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले. अक्षय आनंदा चौधरी (रा. नांदोशी हवेली) असे आरोपीचे नाव आहे. किरकटवाडी रस्त्यावरील काच कारखान्याजवळ बाळासाहेब शंकर घुले यांचा २७ एप्रिल २०१७ रोजी खून झाला होता. यातील ८ आरोपींना या पूर्वी अटक करण्यात आली आहे. चौधरी फरार होता. गणेश पेठेतील शिवरामदादा तालीम येथे एका व्यक्तीला तो भेटायला येणार असल्याची माहिती फरासखाना पोलीस स्टेशनमधील पोलीस कॉन्स्टेबल शंकर संपते यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौधरीला पकडले. घटनेच्या दिवशी आरोपी तानाजी कांबळे याने डंपरच्या सहाय्याने मयत घुले यांच्या गाडीचा पाठलाग केला होता. डंपरने त्यांच्या गाडीस ठोकर मारली. त्यामुळे घुले यांची गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेली. त्यावेळी दुसऱ्या चारचाकी गाडीतून मिलींद किवळे, राहुल किवळे, अक्षय चौधरी, दत्ता पोकळे व पाच अनोळखी व्यक्ती आल्या. मिलिंद व राहुल किवळे यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्वरमधून घुले यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यातून घुले आणि त्यांचे साथीदार बचावले. त्यानंतर घुले यांना गाडीतून बाहेर काढत अक्षय चौधरी, दत्ता पोकळे आणि इतर आरोपींनी कोयत्याने वार करुन ठार मारले. या प्रकरणी चौधरी हा पोलिसांना चकवा देत होता. त्याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात बेकायदा पिस्तूल बाळगणे, खुनाचा प्रयत्न अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Puneपुणे