शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

‘मुरांबा’ फेम अभिनेत्री, ‘वेब क्वीन’ मिथिला पालकर ‘फोर्ब्स’च्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:51 IST

‘मुरांबा’ फेम अभिनेत्री मिथिला पालकर हिचे नाव प्रतिष्ठेच्या ‘फोर्ब्स इंडिया’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीत झळकले आहे. 

ठळक मुद्देआशिया खंडातील आश्वासक ३० युवक-युवतींची तयार करण्यात आली यादी‘माझं हनिमून’ या शॉर्ट फिल्मद्वारे २०१४ मध्ये करिअरला सुरुवात

पुणे : अभिनेता आलोक राजवाडे आणि निपुण धर्माधिकारी यांच्यानंतर आता ‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून सर्वांमध्ये सुपरिचित असलेली ‘मुरांबा’ फेम अभिनेत्री मिथिला पालकर हिचे नाव प्रतिष्ठेच्या ‘फोर्ब्स इंडिया’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीत झळकले आहे.  ‘फोर्ब्स इंडिया थर्टी अंडर थर्टी’ अंतर्गत आशिया खंडातील संगीत, क्रीडा, रंगभूमी, ई-कॉमर्स, साहित्य, कायदा, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील ३० वर्षांखालील युवकांचा या यादीमध्ये अंतर्भाव केला जातो. त्यात आशिया खंडातील आश्वासक ३० युवक-युवतींची यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये मिथिला या मराठमोळ्या अभिनेत्रीनेही स्थान पटकावले. सर्वप्रथम यूट्यूबवर स्वत:च्या आवाजातील गाणी अपलोड करण्यामुळे ही अभिनेत्री प्रकाशझोतात आली. २०१४ मध्ये मिथिलाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘माझं हनिमून’ या शॉर्ट फिल्मद्वारे तिने करिअरला सुरुवात केली. १६ व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. त्यानंतर  ‘कट्टी बट्टी’ हा चित्रपट तिने केला. ‘माध्यमातून महाराष्ट्र देशा’साठी तिने गाणेही गायले आहे. अमेय वाघ याच्यासमवेत २०१७ मध्ये ‘मुरांबा’ चित्रपटात ती झळकली.

टॅग्स :Mithila Palkarमिथिला पालकरPuneपुणे