शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘थर्ड पार्टी इन्स्पेकशन’ वर पुणे महापालिकेची पुन्हा खैरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 06:00 IST

‘एक काम, त्यात पैसे खाणारी दहा तोंडे’ असा प्रकार असताना महापालिका प्रशासनाने त्यातील बंद झालेले एक तोंड पुन्हा खुले केले.

ठळक मुद्दे विकास कामांची तपासणी: बंद केलेल्या कंपन्यांना परत निमंत्रण प्रशासन त्यासाठी तटस्थ यंत्रणेवर वार्षिक काही कोटी रूपये खर्च करणार

राजू इनामदार

पुणे: मागील दोन वर्ष बंद असलेली महापालिकेच्या कामांचे थर्ड पार्टी इन्स्पेकश्न करण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आयुक्त स्तरावर घेण्यात आला आहे. ‘एक काम, त्यात पैसे खाणारी दहा तोंडे’ असा प्रकार असताना महापालिका प्रशासनाने त्यातील बंद झालेले एक तोंड पुन्हा खुले केले अशी चर्चा त्यातून पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. पालिकेच्या अभियंत्यांकडूनच कामांची तपासणी अपेक्षित असताना प्रशासन त्यासाठी तटस्थ यंत्रणेवर वार्षिक काही कोटी रूपये खर्च करणार आहे.ही यंत्रणा म्हणजे कंपन्यांनी पालिकेच्या विकासकामांची तपासणी करून त्याबाबत अहवाल द्यायचा असतो. त्यांचे प्रमाणपत्र असल्याशिवाय काम केलेल्या ठेकेदार कंपन्यांची बीले प्रशासनाकडून काढली जात नाहीत. प्रत्येक प्रभाग कार्यालयाला अशी एखादी कंपनी प्रशासनाकडून दिली जाते. त्यासाठी कामाच्या रकमेच्या २ टक्के रक्कम कंपनीला मानधन म्हणून दिली जाते. थर्ड पार्टी इन्स्पेक्शन असे या पद्धतीचे नाव आहे. महापालिकेच्या विकासकामांची गुणवत्ता वाढावी, ती कामे दर्जेदार व्हावीत यासाठी म्हणून अशी तटस्थ यंत्रणेकडून त्या कामांची तपासणी करण्याची पद्धत पालिकेने काही वर्षांपुर्वी ती सुरू केली होती. रस्त्यांचे डांबरीकरण, ड्रेनेजची बांधणी किंवा पाण्यासाठी पाईपलाईन टाकणे, पदपथ तयार करणे अशी अनेक कामे पालिकेकडून दरवर्षी होत असतात. त्यासाठी कामाची रक्कम निश्चित करून निविदा जाहीर केली जाते. आलेल्या निविदांमधून ज्या ठेकेदार कंपनीचे दर कमी असतील (प्रशासनाने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा कमी नाही तर आलेल्या निविदांमधील कमी दराच्या) त्यांना काम दिले जाते. यातील कामाची रक्कम निश्चित करणे,त्याची निविदा तयार करणे वगैरे काम शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्याकडून केले जात असते. पालिकेच्या सेवेत असलेल्या या वरिष्ठ, कनिष्ठ अभियंत्यांकडूनच ठेकेदार कंपनीच्या कामावर देखरेख ठेवणे, त्याचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेणे अपेक्षित आहेमात्र त्यांच्यावर अविश्वास दाखवून पालिकेने ही स्वतंत्र थर्ड पार्टी इन्स्पेक्शनची पद्धत सुरू केली होती. या कंपन्यांकडे बांधकाम व पालिकेच्या कामांशी संबधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असाव्यात, त्यांना अशा प्रकारच्या कामाचा अनुभव असावा असे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात पाहणी न करताच ठेकेदाराला त्याचे काम चांगले असल्याचे प्रमाणपत्र दिले जात असल्याचे ‘लोकमत’ ने काही वर्षांपुर्वी उघडकीस आणले होते. त्यासाठी वेगळे अर्थकारण होत होते. एकाही कंपनीकडून कामाबाबत हरकत घेतली असल्याचे उदाहरण पालिकेत नव्हते. ज्या हरकती घेतल्या त्या कामाशिवायच्या म्हणजे काम झाल्यावर डबर तसे ठेवले अशा प्रकारच्या होत्या.---------------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका