पुणे: फाईलचे साठलेले ढिग, अस्ताव्यस्त पसरलेले कागदपत्रांचे गठ्ठे, धूळ खात व जळमटांमध्ये पडलेल्या फाईल्स, बंद संगणक, मोडक्या टेबल, खुर्च्या हे महापालिकेच्या कार्यालयातील चित्र हळूहळू बदलत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सर्व कर्मचारी कार्यालय स्वच्छतेमध्ये व्यस्त असून, गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या कागदपत्राचे वर्गीकरणाचे काम जोमाने सुरु आहे. यामुळे सध्या महापालिकेच्या सर्व कार्यालयामध्ये लाल, पिवळया,हिरव्या रंगाचे गठ्ठे सर्वत्र दिसत आहेत. कोणतेही शासकीय कार्यालय म्हटले की, फाईलींचा असलेला ढिग, अस्ताव्यस्त पसरलेले गठ्ठे, फाईलींवर पडलेली जळमटे आणि धूळ असेच चित्र समोर येते. पूर्वीपासून सरकारी कार्यालयांमध्ये एखादी फाईल शोधणे म्हणजे कठीण काम. शंभर फाईली शोधल्यानंतर हवी असलेली फाईल मिळते. फाईलींची रचना करावी, त्यासाठी कार्यपध्दत आखावी. हा विचार कधी करण्यात आला नव्हता. त्यामुळे नव्या दाखल झालेल्या फाईलींची प्रकरणे निकाली झाल्यानंतर याचा पुन्हा ढिग लावला जात होता. हीच परिस्थिती पुणे महापालिकेमध्ये देखील आहे. यामुळेच गेल्या अनेक दशकांपासून येथे फाईलस, कागदपत्राचे वर्गीकरणच करण्यात आलेले नाही. यामुळे काही ठराविक कालावधीनंतर नष्ट करावयाचे कागद, फाईलचे ढिग साठले आहेत. परंतु महापालिका नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी पदभार स्विकारल्यानंतर कार्यालयाची स्वच्छता हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे. यामुळेच सध्या महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम जोरात सुरु आहे.
महापालिकेची कार्यालये होताहेत ‘चकाचक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:17 IST
महापालिका नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी पदभार स्विकारल्यानंतर कार्यालयाची स्वच्छता हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे.
महापालिकेची कार्यालये होताहेत ‘चकाचक’
ठळक मुद्दे‘झिरो पेन्डन्सी’ व फाईलच्या वर्गीकरणाचे काम जोमाने सुरुकागदपत्राचे अ,ब,क,ड अशी वर्गीकरण करून मुदत संपलेली प्रकरणे निर्लेखित करण्याचे काम सुरु झिरो पेन्डन्सीबाबत लवकरच कर्मचारी, अधिका-यांचे प्रशिक्षण देखील घेण्यात येणार