शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

महापालिकेची इमारतही नाही दिव्यांगपूरक; रॅम्प उभारण्याच्या चर्चेसाठी गेलेला दिव्यांगच पडून जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 6:17 AM

शहरातील महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणेदेखील दिव्यांगांसाठी अडथळामुक्त नसल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी रॅम्प तयार करण्याच्या प्रमुख मागणीसाठी महापालिकेत चर्चा करण्यासाठी गेलेल्या दिव्यांग व्यक्तीला जखमी होऊन परतावे लागले.

पुणे : शहरातील महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणेदेखील दिव्यांगांसाठी अडथळामुक्त नसल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी रॅम्प तयार करण्याच्या प्रमुख मागणीसाठी महापालिकेत चर्चा करण्यासाठी गेलेल्या दिव्यांग व्यक्तीला जखमी होऊन परतावे लागले.दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शिष्टमंडळ शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी गेले होते. गेले काही दिवस शहरातील सार्वजनिक ठिकाणी वावर करताना दिव्यांगांना अडथळ््यांचा सामना करावा लागत आहे. घोले रस्त्यावरील कलादालनात महापालिकेने दिव्यांग दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात चक्क प्लायवूडचा रॅम्प म्हणून वापर करावा लागला होता. त्यावरून महापालिकेवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. बालगंधर्व कलादालनात देखील दिव्यांगांना कोणतीही सोय नसल्याने त्यांना नुकत्याच झालेल्या एका छायाचित्र प्रदर्शनाला देखील अक्षरश: उचलून न्यावे लागले. तसाच प्रकार शुक्रवारी घडला. प्रहारच्या पदाधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी एक वाजता वेळ दिली होती. त्या नुसार मीना धोत्रे, रफीक खान, गोविंद वाघमारे, राहुल मगर हे गेले होते. त्यानंतर परतत असताना दुपारी अडीचच्या सुमारास महापालिकेच्या मुख्य दरवाजा समोरील पायºयांवरून राहुल मगर हे पडल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.पर्सन विथ डिसअ‍ॅबिलिटी कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी अडथळामुक्त वातावरणासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. त्यातून रॅम्प, दिव्यांगांसाठी विशेष स्वच्छतागृह, दिशादर्शक, पिण्याच्या पाण्यासाठी विशेष सुविधा अशा विविध सोयी करता येऊ शकतात.त्यासाठी केवळ अपंग कल्याण आयुक्तालयाच्या माध्यमातूनप्रस्ताव पाठवावा लागतो. मात्र, ती तसदीदेखील अनेक सरकारी आस्थापना घेत नसल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.महापालिकेसह, नाट्यगृह आणि सार्वजनिक ठिकाणी रॅम्प व आवश्यक तिथे रेलिंग करावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याबाबत यापूर्वीही महापालिका अधिकाºयांची तीनदा चर्चा झाली आहे. शुक्रवारच्या बैठकीत देखील अडथळामुक्त वातावरणच्या मुद्द्यावर चर्चा झाली.- राहुल मगर, जखमी दिव्यांग

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका