शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
4
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
5
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
6
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
7
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
8
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
9
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
10
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
11
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
12
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
13
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
14
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
15
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
16
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
17
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
18
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
19
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
20
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."

महापालिका देणार एका अपत्यावर थांबणाऱ्यांना पन्नास हजार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 3:06 PM

महापालिकेच्या वतीने कुटुंबनियोजन कार्यक्रमाला उत्तेजन म्हणून सन २०११ पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. यात एका अपत्यानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कर्मचाऱ्याला दोन वेतनवाढ देण्यात येत होत्या.

ठळक मुद्देपदोन्नती दिल्यानंतर वेतनवाढ करण्याऐवजी वेतन कमी करण्यासारखाच निर्णय असल्याची टीका राज्य सरकारने असा कोणताही आदेश महापालिका प्रशासनाला दिलेला नाही

पुणे: एका अपत्यानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या दोन वेतनवाढी थांबवण्याचा व त्याऐवजी ५० हजार रूपये एकाच वेळेस देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. स्थायी समितीसमोर तो ठेवण्यात आला आहे. पदोन्नती दिल्यानंतर वेतनवाढ करण्याऐवजी वेतन कमी करण्यासारखाच हाही निर्णय अनाकलनीय असल्याची टीका कर्मचारी संघटनांकडून होत आहे. महापालिकेच्या वतीने कुटुंबनियोजन कार्यक्रमाला उत्तेजन म्हणून सन २०११ पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. यात एका अपत्यानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कर्मचाऱ्याला दोन वेतनवाढ देण्यात येत होत्या. आता त्यात प्रशासनाने बदल सुचवला आहे. त्यासाठी राज्य सरकारने असा कोणताही आदेश महापालिका प्रशासनाला दिलेला नव्हता, त्यामुळे वेतनवाढ देणे कायद्याला धरून नाही, त्यांना एकाच वेळी ५० हजार रूपये देण्यात यावेत असा बदल प्रशासनाने सुचवला आहे. तसा प्रस्तावच स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.महापालिकेचा प्रशासन विभाग आता राज्य सरकारच्या विविध नियमांमुसार महापालिका कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्णय करू लागला आहे. त्याचाच परिणाम म्हणून मध्यंतरी काही अधिकाऱ्यांची उपायुक्त पदावर बढती झाल्यानंतर त्यांचे वेतन वाढण्याऐवजी दरमहा तब्बल साडेचार हजार रूपयांनी कमी झाले होते. असाच प्रकार एकूण ६५४ कर्मचाऱ्यांच्या संदर्भातही झाला आहे. त्यांचेही वेतन राज्य सरकारचे विविध नियम दाखवून कमी करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी प्रशासनाच्या विरोधात मध्यंतरी आंदोलनही केले होते.आता कुटुंबनियोजन कार्यक्रमाला उत्तेजन म्हणून महापालिकेने सुरू केलेल्या योजनेलाही विरोध करण्यात येत आहे. वेतनवाढ ही कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाची बाब असतेच शिवाय सेवेत आहे तोपर्यंत या वेतनावाढीचा उपयोग होत राहतो. त्यावर आता महापालिका प्रशासनाने संक्रात आणली आहे. सन २०११ पासून काहीजणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, आता त्यांच्या वेतनातून वसूली करणार का असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत. महापालिका स्वायत्त संस्था आहे, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, वेतनवाढ पदोन्नती याबाबत निर्णय घेण्यास ती स्वतंत्र असतानाही सरकारी नियम का लावले जात आहे, अशी विचारणा संघटनेकडून होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEmployeeकर्मचारी